{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

 

आश्वी । झुंझार न्यूज

 

आदिवासी हा या देशाचा मूळ मालक आहे, मात्र त्याला ‘वनवासी’ संबोधून निराधार करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही आदिवासी समाज मूलभूत गरजांपासून वंचित असून, आता आपल्या हक्कासाठी आणि भावी पिढीच्या भवितव्यासाठी एकजुटीने लढा उभारण्याची वेळ आली आहे,” असे परखड प्रतिपादन एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा म्हाडा (नाशिक विभाग) माजी अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांनी केले.

संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील साई मंगल कार्यालयात ‘एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य’च्या वतीने आयोजित ‘आदिवासी अधिकार अभियान व युवा जनजागृती मेळावा’ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

आपल्या भाषणात शिवाजीराव ढवळे यांनी केंद्र व राज्य सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, २०१9 नंतरच्या काळात आदिवासी समाजाच्या अडचणी वाढल्या आहेत. आदिवासींना ‘वनवासी’ म्हणणे हे त्यांना त्यांच्या हक्काच्या जमिनीपासून आणि ओळखीपासून दूर करण्याचे कारस्थान आहे. “आदिवासी समाजासाठी कागदावर अनेक योजना आहेत, पण त्याचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतो का? हा मोठा प्रश्न आहे. आज ही आपल्या जमिनींवर अतिक्रमणे होत आहेत, समाज केवळ वापरापुरता राहिला आहे,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

ढवळे यांनी आदिवासी तरुणांना आवाहन केले की, “
किती दिवस आपण इतरांच्या दावणीला बांधले जाणार? केवळ मजुरी करून आपले भविष्य घडणार नाही. आपला समाज शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा पाईक आहे. निसर्ग आणि वनराई हेच आमचे खरे दैवत आहे. आपल्या अस्तित्वासाठी तरुणांनी आता प्रामाणिकपणे आणि निष्ठेने संघटनेचे काम करून लढा दिला पाहिजे.

यावेळी संगमनेर तालुकाध्यक्ष अनिल बर्डे म्हणाले की , एकलव्य संघटना ही तालुक्याच्या तळागाळा पर्यंत पोहचविली आदीवाशी समाज्यासाठी अहोरात्र काम करत आहे आता गांव तेथे एकलव्य संघटना उभी करणार असल्याचे सांगितले .

या मेळाव्याला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उपनेते लक्ष्मणराव वडले, शिवाजीराव भालेराव, शेतकरी संघटनेचे नेते सुधीर बिंदे, एकलव्य संघटनेचे महासचिव किरण ठाकरे, प्रदेश सरचिटणीस प्रा. वैभव सोनवणे, अशोक माळी, खंडू भैरम, राजेंद्र पिंपळे, शिवाजी मोरे, संगमनेर तालुकाध्यक्ष अनिल बर्डे, शिवसेना तालुकाध्यक्ष प्रकाश गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

दोन तास उशीर होऊनही जनसागर ओसंडला
कार्यक्रमाला नियोजित वेळेपेक्षा दोन तास उशीर झाला, तरीही आश्वी परिसरातील आदिवासी बांधव, मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिला आणि तरुण कार्यकर्ते चिकाटीने थांबून होते. कार्यकर्त्यांचा हा उत्साह पाहून संघटनेची ताकद अधोरेखित झाली. या प्रसंगी संघटनेच्या वतीने विविध पदाधिकाऱ्यांच्या नवनियुक्त्या करण्यात आल्या.

या कार्यक्रमाला पुनम माळी (जिल्हा संघटक), नानासाहेब बर्डे, अनिल रोकडे, बाळकृष्ण दरेकर, भाऊसाहेब माळी, अनिल मोरे, महेश बर्डे, गौतम पवार, बाळू माळी, गणेश मोरे (युवा तालुकाध्यक्ष), निरंजन मोरे, बाळासाहेब पवार (टायगर फोर्स), गणीभाई मोमीन, मारुती पवार, मंदाताई पवार (महिला आघाडी), रत्नाबाई बर्डे, उज्वला पोकळे, अनिता सूर्यवंशी, उत्तम जाधव यांच्यासह सागर माळी, सुनील बर्डे, अर्जुन पवार, किशोर बर्डे, अनिल पवार, मच्छिंद्र मोरे, गोरख मोरे, आनंद बर्डे, शुभम बर्डे, रवींद्र जिरे यांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *