{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

९ ऑगस्ट रोजी नियोजित ‘चक्काजाम’ आंदोलन होणारच

जनभावना केंद्र सरकारपर्यंत पोहोचवणार

आश्वी । झुंझार न्यूज

पुणे – नाशिक सरळ रेल्वे प्रकल्पाच्या संदर्भात राज्य शासनाने अखेर तज्ज्ञ समितीची स्थापना केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रेल्वे मार्गासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या आमदार सत्यजित तांबे यांच्या प्रयत्नांना यामुळे मोठे यश आले असून, या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले आहे. हा निर्णय म्हणजे या प्रकल्पाच्या दिशेने पडलेले एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे तांबे यांनी म्हटले आहे.

२५ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार सत्यजित तांबे यांनी पुणे-नाशिक रेल्वेचा प्रश्न लावून धरला होता. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची पूर्तता करत शासनाने आता समिती स्थापन केली असून, ही समिती पुढील ६० दिवसांत आपला अहवाल राज्य शासनाला सादर करणार आहे.

या निर्णयाबाबत समाधान व्यक्त करताना आमदार तांबे म्हणाले की, “उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयाकडे सुरुवातीपासून सकारात्मक दृष्टीने पाहिले आहे. तज्ज्ञ समितीच्या माध्यमातून या प्रकल्पाचा वस्तुनिष्ठ अभ्यास होईल आणि या मार्गाला गती मिळेल, अशी आम्हाला खात्री आहे.”

उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रकल्प महत्त्वाचा

हा रेल्वे मार्ग केवळ प्रवासाचे साधन नसून उत्तर महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाचा कणा ठरणार आहे. सिन्नर, अकोले, संगमनेर, नारायणगाव, आंबेगाव, राजगुरुनगर आणि चाकण मार्गे पुण्याला जोडणारा हा सरळ रेल्वे मार्ग उद्योग, शिक्षण, रोजगार, शेती आणि व्यापारासाठी क्रांती घडवणारा ठरेल, असा विश्वास तांबे यांनी व्यक्त केला.

९ ऑगस्टला चक्काजाम आंदोलन नियोजितप्रमाणेच

राज्य सरकारने समिती स्थापन केली असली तरी, लोकांच्या भावना केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी ९ ऑगस्ट २०२६ रोजी ‘क्रांती दिना’निमित्त होणारे चक्काजाम आंदोलन नियोजित वेळेनुसारच होईल, असेही आमदार तांबे यांनी स्पष्ट केले. रविवारी सकाळी ९ वाजता पुणे-नाशिक महामार्गावर हे जनआंदोलन होणार आहे. हे आंदोलन कोणा एकाच्या विरोधात नसून ते रेल्वेच्या समर्थनार्थ आणि केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाला जागृत करण्यासाठी आहे.

 

श्रेयवादावरून रेल्वे संघर्ष समितीचा घणाघात

“ज्यांनी महायुती सरकार आल्यानंतर या रेल्वेचा नियोजित मार्ग बदलला आणि ज्या संगमनेरच्या लोकप्रतिनिधींनी या बदलाला पाठिंबा दिला, तेच आता पत्रकबाजी करून श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत,” अशी टीका रेल्वे संघर्ष समितीने केली आहे. हे आंदोलन संगमनेर तालुक्याच्या भविष्यासाठी असून ‘अभी नही तो कभी नही’ या जिद्दीने सर्वपक्षीय युवक, युवती आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने यात सहभागी व्हावे, असे आवाहन समितीने केले आहे.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *