Shiradi / Zunjar News

 विखे – थोरातांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या राहाता तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. कोपरगावच्या भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र विवेक कोल्हे यांनी विखें विरोधात भूमिका घेत बाळासाहेब थोरातांना साथ दिल्याने या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजपचे विवेक कोल्हे यांनी राहाता मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत सभासद आम्हालाच साथ देतील आणि थोरात – कोल्हे युतीचाच विजय होईल असा विश्वास विवेक कोल्हे यांनी व्यक्त केला आहे.

भाजपचे (BJP) खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी मतदान केंद्राला भेट देत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. प्रचारात दरम्यान टिका करताना विरोधकांची विकृत मानसिकता दिसून आली. मात्र व्यक्तिगत आरोपांना आम्ही खात नाही आणि त्याचे उत्तरही देत नाही.

दक्षिण नगरमध्ये बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने आमच्यावर आरोप करण्यात आले आणि इकडे कारखाना निवडणुकीत आमच्या विरोधकांसोबत भाजप गेली. मात्र आम्ही लहान बाळासारखी तक्रार करत नाही असा टोला सुजय विखेंनी पक्षांतर्गत विरोधकांना लागवला आहे. तर थोरात इकडे निवडणूक लढवायला आले आता आम्हीही संगमनेरात जाऊ असा इशारा खा. सुजय विखे यांनी दिलाय. 

गणेश सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने विखे – थोरातांनी एकमेकांवर अनेक आरोप प्रत्यारोप केलेत. मतदार कुणाच्या पारड्यात कारखाना टाकणार हे १९ जूनला स्पष्ट होईल. मात्र आगामी काळात विखे – थोरात यांच्या राजकीय संघर्षाला आणखी धार येणार एव्हढं मात्र नक्की. . . 
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *