संगमनेर । झुंजार न्यूज 

 

उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर रयत शिक्षण संस्थेच्या अश्वि इंग्लिश स्कूल या विद्यालयात अतिशय आनंदी व उत्साही वातावरणात नवागतांचे स्वागत करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी पाचवीपासून ते बारावी पर्यंतचे सर्व विद्यार्थी आनंदी चेहऱ्याने शाळेत दाखल झाले .सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी सर्व शिक्षक वृंद विद्यालयाचे प्राचार्य श्री बर्डे जे.आर .हे सर्व उपस्थित होते .

इयत्ता पाचवीत नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत स्कूल कमिटीचे सदस्य श्री.सुमतीलालभाऊ गांधी व शाळा व्यवस्थापन व शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे प्रमुख मच्छीन्द्र भुसाळ पा. विद्यालयाचे प्राचार्य बर्डे सर यांनी पेन व पुस्तकांचा संच देऊन केले. या सर्वांबरोबर पालक व माध्यमिक ,उच्च माध्यमिक शिक्षक देखील उपस्थित होते.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *