संगमनेर | झुंजार न्यूज 

संगमनेर तालुक्यातील मालुंजे येथील नवोदय विदयालयातील विदयार्थीनीकडून राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करण्यात आला .

विदयालयाच्या प्रांगणात घेण्यात आलेल्या  जिजाऊंच्या जयंतीनिमित्ताने त्याच्या कार्याचा उजाळा देण्यात आला. मुख्याध्यापक सुधाकर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात किशोरी कुटे, श्रावणी बुरकुल,व वैष्णवी सोसे या विद्यार्थ्यांनी जिजाऊंच्या ऐतिहासिक कार्याला उजाळा देत जिजाऊंच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला . 

महापुरूषांच्या जयंती व स्मृतिदिन महापुरुषांच्या कार्याचा आढावा घेऊन त्या कार्याची प्रेरणा घेऊन वाटचाल करण्यासाठी असल्याने असे कार्यक्रम महत्वाचे असल्याचे अशोक बाभुळके यांनी प्रास्ताविक भाषणात सांगितले. तर जिजाऊंचे प्रेरणादायी चरित्र आपल्या व्याख्यानातून अनिल मुन्तोडे यांनी उलगडून दाखवले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दिलीप बर्डे यांनी केले.आभार प्रदर्शन रावसाहेब गिते यांनी केले.यावेळी मंचावर श्रीकांत कुलकर्णी, धनश्री खेमनर, सुभाष आंधळे, संजय नागरे, सुभाष मुन्तोडे व विजयकुमार खरात यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *