संगमनेर | झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील बालपण स्कूलच्या चिमुकल्यांनी अनोख्या पध्दतीने साजरा केला फादर्स डे**
वडील आणि मुलांमधील नातं खूप खास असतं. हे नातं अधिक खास करण्यासाठी आपण दरवर्षी ‘फादर्स डे’ साजरा केला जातो .

Fathers Day 2023 बालपण स्कूल आयोजित ‘१८ जून फादर्स डे’ला तुमच्या प्रेमळ वडिलांशी नात घट्ट होण्यासाठी व रूढी व परंपरा जोपासण्यासाठी बालपण स्कूल ने अनोखा उपक्रम आयोजित करत फादर्स डे साजरा केला.

वडील हे घरातील महत्त्वाचे सदस्य असतात, संपुर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असते. आपल्या कुटुंबाची देखभाल करण्यासाठी आणि कुटुंबातील सर्वांना आनंदी ठेवण्यासाठी ते रात्रंदिवस कष्ट करतात. वडील सर्वांवर प्रेम करतात, ते नात दृढ होण्यासाठी बालपण स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या वडिलांचे पुजन करून औक्षण त्यांचे दर्शन घेत व भेटवस्तू देत एक पारंपरिक पध्दतीने वडील व मुलगा यातील नात अधिक दृढ होण्यासाठी फादर्स डे साजरा केला. या उपक्रमासाठी बालपण स्कूल पानोडी व आश्वी चे सर्व शिक्षक वर्ग तसेच बालपण स्कूल च्या प्रमुख सौ. सोनाली मुंढे यांच्या संकल्पनेतून हा दिवस साजरा केला.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *