संगमनेर / झुंजार न्यूज
संगमनेर तालुका अध्यक्षपदी खांडगाव येथील आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते बाळासाहेब सुखदेव मोकळ यांची निवड केली असल्याची घोषणा जिल्हाध्यक्ष सुधाकरराव रोहम यांनी पक्षाचे राष्ट्रीय नेते डॉ राजेंद्र गवई , प्रदेश अध्यक्ष सुबोध जी वाघमोडे यांच्या आदेशान्वये केली .
रिपाई ( गवई ) पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक संगमनेर येथील शासकीय विश्रामगृह येथे जिल्हाध्यक्ष सुधाकरराव रोहम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली याप्रसंगी उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष सुरेशराव देठे , सरचिटणीस किशोर वाघमारे , उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र घायवट , प्रदेश सदस्य बन्सी घंगाळे, जिल्हा उपाध्यक्ष जालिंदर बोरुडे , तालुका कार्याध्यक्ष बाळासाहेब गायकवाड , रायते गावच्या सरपंच रूपालीताई रोहम , सरचिटणीस गौतम रोहम यांच्यासह ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते .
यावेळी जिल्हाध्यक्ष सुधाकरराव रोहम यांनी संगमनेर तालुक्यासह जिल्हा पदाधिकारी यांच्या पदामध्ये फेरबदल करत संगमनेर तालुकाध्यक्ष पदी बाळासाहेब मोकळ यांची निवड केली तर रमेशराव बनसोडे यांना जिल्हा कायदेशीर सल्लागार , जालिंदर बोरुडे यांची उपाध्यक्षपदी , राजेंद्र भाऊसाहेब जमदाडे पठार भाग प्रमुख , वसंत गवाजी खरात , आश्वी गट संपर्कप्रमुख भारत गायकवाड , बाळासाहेब नाना गायकवाड यांना कार्याध्यक्ष , संजय भोसले यांना तालुका उपाध्यक्ष , शरद भालेराव यांना तळेगाव गटप्रमुख , राजेंद्र गवळी यांना वडगाव गटप्रमुख , विजय अडांगळे यांना निमगाव गटप्रमुख घोषित केले .
जिल्हाध्यक्ष रोहम म्हणाले की , संगमनेर तालुक्यातील सर्व गटात आपला संपर्क अभियान राबवून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष गावोगावी पोहचवा आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांसाठी तयारीला लागा व कोणत्याही आदेशाची वाट न पाहता जिल्हा परिषद नऊ गट व पंचायत समितीच्या 18 गण कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी उभे राहण्यासाठी सज्ज रहा . तर गावोगावी शासन आपल्या दारी विविध दाखले वाटप विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे प्रश्न नागरिकांच्या वैयक्तिक लाभाच्या योजना विजेचे प्रश्न आदि महत्त्वाच्या प्रश्नाला चालना देऊन नागरिकांच्या समस्या सोडवा .
यावेळी तालुकाध्यक्ष बाळासाहेब मोकळ म्हणाले की , जिल्हाध्यक्ष सुधाकर रोहम यांनी मला तालुकाध्यक्ष पदाची काम करण्याची संधी दिली त्या संधीचं सोनं मी आपल्या नेतृत्वाखाली नक्कीच करेल मी पक्षाचे काम माझ्या गावापासून सुरुवात करणार असून आजही अनेक समाजाचे प्रश्न प्रलंबित असून ते सोडवण्यासाठी माझ्या पदाचा योग्य तो वापर करीन .
याप्रसंगी सुरेशराव देठे , किशोर वाघमारे , राजू घायवट यांनी आपले मनोगत व्यक्त केले .
यावेळी सुनील रुपवते , बाजीराव रुपवते , प्रफुल्ल मोकळ , समाधान मोकळ , सुनील मोकळ , गणेश गायकवाड , जालिंदर बोरुडे , राजू अहिरे पप्पू गवळी गुड्डू बनसोडे गोरक्षनाथ बनसोडे रमाताई पवार अशोकराव वैराळ सतीश राव अभंग अमोल गायकवाड विजया अडांगळे नितीन जमदाडे रामदास भालेराव सर प्रवीण भोसले सौरभ वाघमारे आधी युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
