संगमनेर / झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील पानोडी येथे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अथक प्रयत्नाने मंजूर झालेली ४ कोटी ८३ लाख रुपये किंमतीची जलजीवन मिशन नळ पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ सोमवार दि . १० जुलै २०२३ रोजी सकाळी १० वाजता जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती जनसेवा विकास मंडळाच्या कार्यकर्त्यानी दिली .
गेल्या अनेक वर्षापासून पिण्याच्या पाण्याची समस्या लोकांना भेडसावत होत्या . राज्याचे महसूल मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नांने पंतप्रधान जलजीवन योजना मंजूर झाल्याने भविष्यात पानोडीकरांना पाण्याची टंचाई भासणार नाही या योजनेमुळे कित्येक वर्षेने लोकाचे स्वप्न साकार झाल्याचे चेहरावर समाधान दिसत असल्याने लवकरचं ही योजना कार्यान्वित व्हावी म्हणून जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या शुभारंभ करण्यात येणार असून संगमनेर गटविकास आधिकारी अनिल नागणे , ग्रामिण पाणी पुरवठा विभागाचे अभियंता श्रीरंग गडधे , शाखा अभियंता प्रदीप संवत्सरकर आदी उपस्थित रहाणार आहे .
तरी परिसरातील कार्यकर्ते , ग्रामस्थांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन माजी उपसंरपच अशोकराव तळेकर , नानासाहेब शिंदे , राजेंद्र जाधव , रावसाहेब घुगे , भाऊसाहेब चव्हाण , ग्रा प सदस्य संजय जाधव , भारतराव शेवाळे , नाना उर्फ सुधाकर कदम , बाळासाहेब कदम , रंगन्नाथ मुंढे , नय्युम सय्यद , पुंजा पाटील नागरे , पांडूरंग सांगळे , अशोक सांगळे , नामदेव हजारे , दिपक जाधव सर , सुभाष पवार , मधुकर कदम , पार्टी उर्फ विजय कदम , रामभाऊ घुगे आदीनी केले
