मुंबई । झुंजार न्यूज 

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे व माहिती व जनसंपर्क  महासंचालक श्रीमती जयश्री भोज यांना अधिस्वीकृती समिती संदर्भात चुकीचे प्रस्ताव पाठवणार्‍यांवर कारवाई करावी अशा आशयाचे प्रातिनिधीक स्वरुपात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे महासचिव डॉ विश्‍वासराव आरोटे. व त्यांच्या शिष्टमंडळाने मुंबई येथे भेट घेवुन निवेदन दिले.

राज्याभरात संपूर्ण संघटनेचे वतीने विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांना निवेदन देऊन याबाबत या घटनेचे सर्व माहिती दिली.
याविषयीची माहिती संघटनेच्यावतीने मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांना देण्यात आली. याबाबत योग्य ती चौकशी करून चुकीचे काम करणार्‍यांना कधीही पाठीशी घालणार नाही अशा सुचना अधिकार्‍यांना व कर्मचार्‍यांनी शासनाचे आपण कर्मचारी आहोत, त्यामुळे अशा चुकीचे काम करणार्‍या अधिकार्‍यांना कधीही पाठिंबा देणार नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना सांगितले.
यावेळी राज्य पत्रकार संघाच्या दिनदर्शिका, डायरी, घड्याळ व स्मृतिचिन्ह देऊन ना. शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राज्य सचिव डॉ. विश्‍वास आरोटे, पत्रकार संघाचे संजय फुलसुंदर, मराठवाडा वि.स.प्र. कुंडलीक वाळेकर, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष विसे आदी उपस्थित होते.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *