संगमनेर । झुंजार न्यूज

क्षणीक लोभाला बळी न पडता शाश्वत गोष्टीवर शेतकऱ्यांनी भरोसा ठेवा . या कारखान्याचे मालक श्री गजानन महाराज व शेतकरी असून महाराजाच्या आशिर्वादाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या फायदयाकरिता या कारखान्याची निर्मिती केली असून आपण ऊस दराबरोबर स्पर्धा करुनचं इतर कारखान्याबरोबर दर देणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र बिरोले यांनी सागितले .

 

संगमनेर तालुक्यातील पठार भागाला वरदान ठरलेल्या कौठे – मलकापूर येथील  श्री गजानन महाराज शुगर लिमिटेड ( भक्तनगर )  या कारखान्याच्या गळीत हगांम शुभारंभा प्रसंगी रविंद्र बिरोले बोलत होते याप्रसंगी संचालिका सौ अश्विनीताई बिरोले , शंतनू बिरोले , नंदन बिरोले , सौ ईशाताई बिरोले , अॅड रामदास शेजूळ , हरिभाऊ गीते , सुभाष कोळसे , केरुबापू मगर , एकनाथ नागरे , भाऊसाहेब मंडलिक , तानाजी बागुल , कोकणे सर , दिलीप पोटे , कैलास डोंगरे , भास्कर गाडे , गोरक्ष डहाळे , अनिल वाकचौरे , विजय जाधव , फारुकी , आदिसह ऊस उत्पादक , सभासद , वहातुकदार  कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते       

                                                                   

यावेळी रविंद्र बिरोले पुढे म्हणाले की , गेल्या या ७ वर्षापासून  कारखान्याच्या माध्यमातून परिसरासह नेवासा , पारनेर , वैजापूर , निफाड , राहुरी , गंगापूर या तालुक्यातील शेतकऱ्यांचा विश्वासर्हता निर्माण केला या कारखान्याचे ऊस उत्पादक शेतकरी हा कणा असून तेचं कारखान्याचे मालक आहे त्यामुळेचं भविष्यात कारखाना व परिसरात हा सजलाम् – सुफलाम्  दिसणार आहे तेव्हा शेतकऱ्यांनी सुद्धा प्रामाणिकता ठेवून कारखान्याला सहकार्य करावे . हा कारखाना हा भाव देतो , तो कारखाना हा भाव देतो ही चर्चा करण्यापेक्षा आपल्याला आर्थिक फायदा कसा होईल हे बघा . मी काटा मारुन दर सांगत नाही तर तुमच्याशी प्रामाणिकपणाने राहूनचं तुमच्या फायदयाचं बघतो तेव्हा इतर कारखान्यापेक्षा निश्चित २५ पैसे जास्तचं ऊसाला भाव देणार तर वहातुकदारांसुद्धा नाराज करणार नाही . 

चौकट 

१ ) मागील वर्षी ३५ कि मी बाहेरील ऊस उत्पादकांना २३१० रुपये दिला तर परिसरातील ऊस उत्पादकांना २४१० रुपये दिला होता त्यातील राहिलेले शिल्लक १०० रुपये व साखर दिवाळीपुर्वी ऊस उत्पादकांना  देणार  

२ ) संध्या कमी ऊस असल्याने शेतकर्‍यांनी व कर्मचाऱ्यांनी चिंता करु नये महाराजाच्या आशिर्वादाने सर्व काही ठिक होणार असून हा हंगाम आपला निश्चित यशस्वी होणार ! 

 
रविंद्र बिरोले ( संस्थापक अध्यक्ष , श्री गजानन महाराज कारखाना )
 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *