थोरात कारखान्याच्या पहिल्या साखर पोत्याचे पूजन
संगमनेर । झुंजार न्यूज
देशातील सहकारासाठी मापदंड ठरलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन 2023- 24 या गळीत हंगामाच्या पहिल्या साखर पोत्याचे पूजन रविवार दिनांक 5 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 4.30 वाजता काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा मा. महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते व मा. आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत आणि कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती उपाध्यक्ष संतोष हासे यांनी दिली आहे.
या कार्यक्रमाबाबत अधिक माहिती देताना असे म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली थोरात कारखान्याने यावर्षी 2835 रुपये उच्चांकी भाव दिला आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर गळीत हंगामाचा शुभारंभ अत्यंत साध्या पद्धतीने झाला असून सन 2023- 24 या गळीत हंगामातून उत्पादित झालेल्या पहिल्या साखर पोत्याचे पूजन रविवार दिनांक 5 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 4.30 वा. काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात व त्यांच्या सुविध पत्नी सौ कांचनताई थोरात, मा. आ डॉ सुधीर तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी आमदार सत्यजित तांबे, बाजीराव पा खेमनर , ॲड माधवराव कानवडे, सौ दुर्गाताई तांबे, रणजीत सिंह देशमुख, सुधाकर जोशी, संपतराव डोंगरे, शंकरराव खेमनर ,रामहरी कातोरे, इंद्रजीत भाऊ थोरात, कॅन्सर तज्ञ डॉ जयश्रीताई थोरात,हौशीराम सोनवणे, सौ सुनंदाताई जोर्वेकर, अदीं सह विविध पदाधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
तरी या कार्यक्रमासाठी सर्व सभासद ऊस उत्पादक शेतकरी बंधू-भगिनी कार्यकर्ते व पदाधिकारी कामगार यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सर्व संचालक मंडळ व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले आहे.
