आश्वी | झुंजार न्यूज

 

संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द गावांत ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ अभियानाचे मोठया उत्साहात स्वागत करण्यात आले यानंतर अभियानाचा कार्यक्रम कर्मवीर भाऊराव पाटील विदयानिकेतन विदयालयांच्या प्रांगणात संप्रन्न झाला.

केंद्र शासनाच्या पीएम विश्वकर्मा योजना, पीएम उज्ज्वला योजना, पीएम मुद्रा लोन्स, स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया, पीएम आवास योजना, अटल मिशन फॉर रिज्युवनेशन (अमृत), पीएम भारतीय जन औषधी योजना, उजाला योजना, सौभाग्य योजना, आधारकार्ड अपग्रेडेशन तसेच महापालिकेशी निगडीत आयुष्यमान भारत, पीएम स्वनिधी, स्वच्छ भारत मिशन, पीएम ई-बस सेवा, डिजिटल पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर, खेलो इंडिया इ. विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. यासाठी शासनाकडील डिजिटल स्क्रीन असलेली सुसज्ज व्हॅन उपलब्ध करण्यात येवून संगमनेर पचायत समितीच्या माध्यमातून ही व्हॅन गावो – गावी फिरत केंद्र शासनाच्या योजनेचा प्रसार करत आहे . त्याचं अनुसंगाने आश्वी खुर्द येथे ही व्हॅनच्या माध्यमातून ग्रामस्थासह विदयार्थ्याना , महीलांना योजनेची माहिती देण्यात आली .

 

भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यीत लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी हे अभियान राबवले जाणार आहे. लक्ष्यीत लाभार्थ्यांना या माध्यमातून विविध योजनांची प्रत्यक्ष माहिती दिली जात आहे. जास्तीत जास्त नागरीकांनी, लाभार्थ्यांनी या अभियानात सहभाग घ्यावा असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले .

 

यावेळी जि प माजी सदस्या सौ कांचनताई मांढरे , मच्छिद्र थेटे , संजय कहार , संरपच सौ अलकाताई गायकवाड , उपसंरपच बाबासाहेब भवर , विठ्ठलराव गायकवाड , सोपान सोनवणे , सागर भडकवाड , ग्रामसेवक इल्हे , सौ सुवर्णा श्रीरसागर , सौ देवयानी सोनवणे , सौ लोणिया , सौ मुन्तोडे , सौ शिंदे , बापुसाहेब गायकवाड , मकरंद गुणे , दिपक दातीर , अमोल शिंदे , दिपक सोनवणे , उमेश सालकर आदीसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व विदयार्थी उपस्थित होते .

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *