सुप्रसिद्ध गायिका कडूबाई खरात यांच्या गीतांचा कार्यक्रम
सुरेगांव । झुंजार न्यूज
माता रमाई आंबेडकर यांची जयंती व संविधान सन्मान सोहळा निमित्त विविध सामाजिक कार्यक्रम कोपरगाव येथे नामदार रामदास आठवले यांच्या उपस्थितीत शनिवार दि.३ फेब्रु.२०२४ रोजी माता रमाई जयंती निमित्त व संविधान सन्मान सोहळ्यानिमित्त सामाजिक समता परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका अध्यक्ष अनिल रणनवरे यांनी दिली आहे
प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की भारतीय संविधानाचे महत्व व अधिकार सर्वसामान्य नागरिकांना समजावे.तसेच माता रमाबाई आंबेडकर यांचे आचार व विचारांचा प्रसार होऊन महिलांना रमाबाईचे त्यागाचे महत्त्व समजावं याकरिता सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून
यावेळी नामदार राधाकृष्ण विखे पाटील ,आ.आशुतोष काळे माजी आमदार स्नेहलता कोल्हे , सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे , रिपाई राज्य उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे , जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव , रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात तसेच युवक जिल्हाध्यक्ष प्रदिप बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र राज्य सचिव दिपक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय अधिकारीता मंत्री रामदासजी आठवले हे स्वतः उपस्थित राहणार असून येत्या लोकसभेच्या दृष्टीने सदर कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
तसेच या निमित्ताने रिपाईचे तालुका अध्यक्ष अनिल रणनवरे यांच्या संपर्क कार्यालयाचे देखील ना.आठवले यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने सुप्रसिद्ध संविधान अभ्यासक व व्याख्याते विठ्ठल कांगणे सर यांचे व्याख्यान तसेच भीमकन्या कडूबाई खरात यांचा भीमगीतांचा जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे .
या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ,आंबेडकरी चळवळीतील विविध नेते, विविध संघटनांचे कार्यकर्ते तसेच संविधान प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका अध्यक्ष अनिल रणनवरे यांचेसह सोमनाथ लोहकरे,रामदास कोपरे, अकीलभाई शेख, किशोर मैंद, आकाश डोखे, मंगेश मोरे,राहुल सोनवणे,प्रशांत मेहेरखांब,अजित कुशेर,अमोल थोरात,अनिसभाई शेख आदी कार्यकर्त्यांसह तालुका व शहर कार्यकारिणी प्रयत्नशील असून सदर कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
