शिर्डी । झुंजार न्यूज
श्री साई संस्थान को-ऑपरेटिव सोसायटीच्या सभासदांना न्याय मिळावा यासाठी आपण पाच वर्षे लढा दिला त्यावेळी कामगार संघटना यांनी मौन पकडले होते मात्र आपण कामगार हितासाठी कायमस्वरूपी संघर्ष करता आल्यामुळे या निवडणुकीत परिवर्तन विकास मंडळाचा विजय निच्छीत असल्याचा विश्वास विठ्ठल पवार यांनी प्रचार सभेत बोलताना सांगितले
सोसायटी हि कामगाराची कामधेनू असुन संस्था व कामगार हितासाठी आपला लढा असुन १७ उमेदवार छत्री या चिन्हावर उभे असुन कोरी पाटी असलेले उमेदवार उभे केले आहे सभासदांच्या हितासाठी लढा देताना जो त्रास झाला त्याची पावती सभासद परिवर्तन करुन देतील यात शंका नाही साईबाबाचा आशिर्वाद आमच्या पाठीशी आहे भष्टाचाराची प्रकरणे आपण बाहेर काढली आहे विरोधकांचा सत्तेतून पैसा व पैशातून सत्ता या विरोधात आपला संघर्ष आहे विरोधकांनी कधीच कामगार सभासद याच्या हितासाठी कुठलेही योगदान दिले नसताना पॅनल उभे करुन निवडणूक लढवत असताना आपले योगदान काय सभासदासाठी यांचे आत्मचिंतन करावे असा सल्ला दिला आहे
परिवर्तन पॅनल मधुन लता बारसे, विठ्ठल पवार ,रंभाजी गागरे क्रृष्णा आरणे विनोद कोते, देवीदास जगताप सुभाष तुरकणे तुळशीराम पवार भाऊसाहेब लंवाडे गणेश आहीरे सुंनदा जगताप महादु कांदळकर, भाऊसाहेब कोकाटे पोपट कोते रवींद्र गायकवाड इकबाल तांबोळी मिलींद दुनबळे हे छत्री चिन्ह घेऊन निवडणूक लढवत असुन सभासदांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे
दोन अपक्ष देखील नशीब अजमावण्यासाठी प्रयत्न करीत आहे तर साई हनुमान जनसेवा पॅनल व साई जनसेवा पॅनल या निवडणुकीत उभे आहे
