संगमनेर । झुंजार न्यूज 


काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा मा. कृषी व महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील सहकारासाठी दीपस्तंभ ठरलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने दुष्काळी परिस्थिती असतानाही सन 2023 24 या हंगामात सहा लाख मेट्रिक टन उस गाळपाचा टप्पा पार केला असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन व राज्य सहकारी साखर संघाचे उपाध्यक्ष बाबासाहेब ओहोळ यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना ओहोळ म्हणाले की, चालू हंगाम हा अत्यंत अडचणीचा व दुष्काळ जन्य परिस्थितीचा आहे. या कारखान्यावर सर्व सभासद, कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील सर्व ऊस उत्पादक यांचा मोठा विश्वास आहे.  दुष्काळी परिस्थितीत असतानाही  चालू हंगामात सहा लाख मेट्रिक टनाचे गाळप करण्याचा टप्पा पार केला आहे.

हे वर्ष थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे जन्मशताब्दी वर्ष असून या निमित्ताने कारखाना प्रशासकीय नवीन इमारतीमध्ये त्यांचा अर्धाकृती पुतळा उभारला याचबरोबर या निमित्ताने विविध उपक्रम राबवले आहे.

काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने कायम कार्यक्षमता व अचूकता राखून सभासद शेतकरी ऊस उत्पादक व कामगारांच्या हिताचे निर्णय घेतले आहे या चांगल्या कामाबद्दल कारखान्याचा राज्य व राष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कारांनी सन्मान झाला आहे. 5500 मेट्रिक टन क्षमता असलेल्या या कारखान्याने एका दिवसात विक्रमी 9120 मेट्रिक टनाचे गाळप केले आहे. म्हणजे कार्यक्षमतेच्या 165% विक्रमी सरासरीने उत्पादन झाले आहे. यापूर्वीही 5 फेब्रुवारी 2021 रोजी 9020 मे. टन तर 14- 12- 22 रोजी 9010 मे.टन आणि 31 जानेवारी रोजी 9120 इतके विक्रमी उत्पादन झाले आहे.

कारखान्याच्या या यशस्वी वाटचालीत सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे आदर्श तत्व, याचबरोबर काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचे मार्गदर्शन कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे ,सर्व संचालक मंडळ, इंद्रजीत भाऊ थोरात यांचे मोलाचे मार्गदर्शन राहिले असल्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी म्हटले आहे.. या विक्रमी कामगिरीबद्दल कारखान्याची व्यवस्थापन सर्व संचालक कार्यकारी संचालक व कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरांमधून अभिनंदन होत आहे.

चौकट

एका दिवसात विक्रमी 9120 मेट्रिक टन गाळप

आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली थोरात कारखान्याने 5500 मे. टन व 30 मेगावॅट क्षमता असलेला नवीन कारखाना सुरू केला असून यामुळे खर्च कमी होऊन उत्पादन वाढले आहे .5500 याच क्षमतेवर एका दिवसात  9120 मेट्रिक टनाचे विक्रमी गाळप झाले असल्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी सांगितले असून हे सामूहिक यश असल्याचे त्यांनी म्हटले आहे

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *