पानोडी । झुंजार न्यूज

उध्दव ठाकरे यांचे अडीज वर्ष असणाऱ्या सरकारच्या नियोजनातून निळवंडे धरणातून डाव्या व उजव्या कालव्याला पाणी येणारचं हे शाश्वत ठरले होते . त्यातून उजव्या कालव्यातून आलेले पाणी हे पिढ्या नं पिढया असणाऱ्या शेतकऱ्यांचे स्वप्न साकार झाले हा ऐतिहासिक क्षण असल्याचे गौरवोद्गार माजी महसूल मंत्री आ बाळासाहेब थोरात यांनी काढले .

संगमनेर तालुक्यातील पुर्ण भागाला वरदान ठरणार्या निळवंडे उजव्या कालव्यातून पाणी दाखल झाल्याने खळी , पिंप्री लौकी , पानोडी , मालुंजे या गावामध्ये आ थोरात यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले या प्रसंगी आ थोरात बोलत होते .

यावेळी दूध संघाचे चेअरमन रणजीतसिंह देशमुख , व्हा चेअरमन राजू चकोर , अॅड सदाशिवराव थोरात कारखान्याचे व्हा चेअरमन संतोष हासे , गणपत सांगळे , विनायकराव थोरात , गोपाळ थोरात , संरपच गणपत हजारे , उपसंरपच विक्रम थोरात , भिमाजी राहिंज , बबनराव कराड , शिबलापूर संरपच प्रमोद बोंद्रे , दिलावर शेख , नवनाथ आंधळे , बाळू तळेकर , ,वरवंडी संरपच सौ किरण गागरे , विजयराव हिंगे , भास्करराव खेमनर , आबासाहेब जाधव , बळवंतराव थोरात , महादू खेडकर , विठ्ठलराव गायकवाड , शरद जाधव , मच्छिंद्र कदम , बाळू नागरे , जालिंदर तळेकर , माणिक पाबळ , विठ्ठल घोडेकर , सूर्यभान थोरात आदीसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ , शेतकरी उपस्थित होते .

यावेळी आ थोरात पुढे म्हणाले की ,१९८५ ते १९९२ पर्यत निळवंडे चर्चेत राहीला ९२ ला खऱ्या अर्थाने मान्यता मिळाली त्यानंतर अनेक अडचणीवर मात करत निळवंडे धरण व कालव्यांचे कामे होत राहिली प्रकल्पाकरिता लागणार्या जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांचे पुर्नवसन करण्याकरिता चिखली , धांदरफळ या गावांमध्ये जमिनी मिळाल्या ५० एकर जमिन बाळकृष्ण दातीर , शिवाजीराव थोरात यांनी पिंप्री लौकी – आश्वी शिवारात मिळवून दिल्यानेचं हा ऐतिहासिक क्षण आपणास पाहावयास मिळत असून निळवंडे उजव्या कालव्यातून आले पाणी पाहून खर्या अर्थाने शिवाजीराव व बाळकृष्ण दातीर यांना श्रद्धाजंली ठरेल .

प्रकल्पग्रस्ताच्या मुलांना नोकऱ्या देण्यात आले त्यांच्या कुटुबांचे पुर्नवसन करण्यात आले .याकरिता कोण किती झटले हे लोकांना माहित आहे तर यांना फक्त आडकाठ्याचं घालण्याचे काम केले .
प्रास्ताविक उपसंरपच विक्रम थोरात यांनी केले तर सूत्रसंचालन संरपच गणपत हजारे यांनी केले
चौकट
डाव्या व उजव्या कालव्यावरील वरील – खालील सर्व परिसर ओलिताखाली येण्याकरिता मध्यप्रदेशच्या प्रकल्प धरर्तीवर ( स्कॉडा ) सुत्रानुसार नियोजन करावे लागेल याकरिता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा प्रस्ताव दिला त्यांनी ही तत्काळ नियोजन करण्याचे आश्वासन दिले
आ बाळासाहेब थोरात
