शिवपुत्र संभाजी महानाट्यास दुसऱ्या दिवशीही अलोट गर्दी

संगमनेर । झुंजार न्यूज

स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी निळवंडे धरणाचे स्वप्न पाहिले. हे धरण व कालव्यांच्या पूर्ततेसाठी आपण सातत्याने काम केले. त्यामुळे डाव्या व आता उजव्या कालव्यातून तालुक्यात पाणी आल्याने  आपली स्वप्नपूर्ती झाली असून तालुक्यातील जनता सातत्याने पाठीशी उभी राहिली आहे.  संगमनेर तालुका हा विकास कामातून यशस्वी वाटचाल करत असल्याचे गौरव उद्गार काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे.

जाणता राजा मैदान येथे शिवपुत्र संभाजी या नाटकाच्या वेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करताना ते बोलत होते. यावेळी समवेत माजी आमदार डॉ सुधीर तांबे , डॉ जयश्रीताई थोरात व संगमनेर तालुक्यातील आणि अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना आमदार थोरात म्हणाले की, संगमनेर तालुका हा दुष्काळी तालुका आहे परंतु या तालुक्याला पाणी मिळावे याकरता सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी निळवंडे धरणाचे स्वप्न पाहिले. 1999 ला राज्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने कामाला गती दिली. अनेक अडचणीतून मार्ग काढून हे धरण पूर्ण केले.

 आज डाव्या कालव्याबरोबर उजव्या कालव्यातूनही तालुक्यात पाणी आल्याने स्वप्नपूर्ती झाली आहे. 2012 मध्ये धरण पूर्ण झाल्यानंतर निळवंडे धरणातून   संगमनेर शहरासाठी थेट पाईप लाईन योजना आणली. आणि त्यामुळे शहरवासीयांना स्वच्छ व मुबलक पाणी मिळत आहे

तालुक्यातील जनतेने सातत्याने मोठे प्रेम आपल्यावर केले. त्यामुळे राज्य पातळीवर आणि शासनात काम करताना मिळालेल्या संधीचा उपयोग सातत्याने गोरगरिब आणि सर्वसामान्यांच्या विकासासाठी केला. चांगल्या कामामुळे संगमनेर करांचे नाव राज्यात उंचावले आहे.

संगमनेर तालुका हा एक परिवार आहे. सततच्या विकास कामांमुळे तालुका  विकासाचे मॉडेल ठरले आहे .येथील सर्वधर्मसमभाव, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची पद्धत ,कार्यकर्त्यांची मोठी फळी, सहकार ,शिक्षण ,चांगले राजकारण ही आपली वैशिष्ट्य ठरत असून  विकास कामांमुळे संगमनेर तालुका हा राज्यातील प्रगतशील तालुक्यांमध्ये ओळखला जात आहे.

डॉ अमोल कोल्हे यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारताना महाराष्ट्राचा इतिहास पुन्हा जनतेसमोर मांडला आहे. संसदेमध्ये अत्यंत प्रभावी भाषणे त्यांनी केली आहेत. एक उत्कृष्ट व अभ्यासू खासदार म्हणून देशात त्यांची ओळख निर्माण झाली आहे.

संगमनेर तालुक्यात हा आनंद सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा होत असून आगामी काळात सर्वांच्या जीवनामध्ये अधिक आनंद व समृद्धी निर्माण व्हावी अशी प्रार्थना ही त्यांनी केली यावेळी.

खा.डॉ अमोल कोल्हे म्हणाले की, महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने राज्यभरातील आणि तालुक्यातील गोरगरिबांच्या विकासासाठी काम केले आहे. कर्तुत्वान व निष्ठावंत असलेल्या आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रति असलेल्या प्रेमातून उपस्थित जनसमुदाय व आपण या ठिकाणी असल्याचे सांगताना सुसंस्कृत नेता राज्याला दिल्याबद्दल त्यांनी सर्व संगमनेर करांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले .

 यावेळी उपस्थित नागरिकांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात आमदार बाळासाहेब थोरात व खासदार डॉ अमोल कोल्हे यांचे यांचे स्वागत केले. तर डॉ जयश्रीताई थोरात यांनी आभार मानले

चौकट

जाणता राजा मैदानावर तारांगण

आमदार थोरात यांचे व्यासपीठावर आगमन होताच प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला. यावेळी उपस्थित सर्व तरुणाई व नागरिकांनी आपल्या मोबाईलचे टॉर्च ऑन करून सर्वत्र तारांगन निर्माण केले. हा अभूतपूर्व सोहळा विविध समाज माध्यमांवर जोरदार लोकप्रिय ठरला आहे

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *