राहुरी । झुंजार न्यूज
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई पक्षाच्यावतीने पक्षाचे राष्ट्रीय नेते डॉ राजेंद्र गवई यांच्या आदेशानुसार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुरी येथे पक्षाच्यावतीने आज दि २५ मार्च २०२४ रोजी भव्य निर्धार मेळावा व संविधान भाषा व देश बचाव कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष उत्तमराव साळवे यांनी दिली आहे
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सुधाकरराव रोहम हे भूषविणार असून सदर मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुबोध वाघमोडे राष्ट्रीय खजिनदार रामराव दाभाडे तसेच शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी संपर्कप्रमुख किशोर वाघमारे उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहे
सदर मेळाव्यामध्ये पक्षाच्या वतीने शिर्डी लोकसभा मतदारसंघ व अहमदनगर दक्षिण मतदार संघ या दोन्हीही मतदार संघात पक्षाच्या वतीने उमेदवार उभे करण्याकरता आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या वतीने विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांच्या लोकसभा व विधानसभा चाचणी करण्यासाठी मुलाखत घेणारा असून येत्या दहा दिवसांमध्ये महाविकास आघाडीने पक्षाचे राष्ट्रीय नेते डॉ राजेंद् गवई यांना अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी न दिल्यास यापुढील काळामध्ये पक्षाच्या वतीने स्वबळावर उमेदवार उभे करणार असल्यामुळे सदर बैठकीमध्ये उमेदवारीची चाचणी करून पुढे कोणाला मदत करायची यावर विचार विनिमय होणार आहे तसेच पक्षांमध्ये नव्याने प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती आदेश देऊन त्यांना त्यांच्या तालुक्याचे जबाबदारी पार पाडावी लागणार आहे
या बैठकीसाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सरचिटणीस तुकाराम जाधव , जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब गायकवाड , अशोकराव शिंदे , रावसाहेब जमदाडे , पक्ष प्रवक्ते बाळासाहेब पाळंदे , जिल्हा संपर्कप्रमुख जयवंत आढाव , नगरसेवक प्रकाश ढोकणे , जिल्हा संघटक विष्णू हरनामे , उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र घायवट , दक्षिण जिल्हाध्यक्ष बन्सी घंगाळे , ज्येष्ठ नेते दादाभाऊ शिंदे , आदी प्रमुख मान्यवर सदर मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहे
तरी सदर मेळाव्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पप्पू पवार ( तालुकाध्यक्ष ) , हर्षद उत्तम साळवे ( शहराध्यक्ष ) यांनी केले
