संगमनेर । झुंजार न्यूज
संगमनेर येथे ” सामाजिक सलोखा परिषद व संविधान सन्मान सोहळा ” केदींय मंत्री ना डॉ रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत व महसूल मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच लोकगायिका कडूबाई खरात यांच्या क्रांतीकारी भीमगितांच्या भव्य मैफिल मध्ये मंगळवार दि ५ मार्च २०२४ रोजी सायं संगमनेर बस स्थानकामधील पार्किग मैदानात होणार असल्याने कार्यक्रमस्थळाची पाहणी करत कार्यक्रमांच्या तयारीस मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फोडून शुभारंभ करण्यात आले

यावेळी रिपाई राज्य उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे , जिल्हा संपर्क प्रमुख तथा राज्य उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव , उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात , जेष्ठ नेते माणिकराव यादव तालुकाध्यक्ष आशिष शेळके , किशोर चव्हाण , शहराध्यक्ष कैलास कासार , युवा तालुकाध्यक्ष योगेश मुन्तोडे , अकोले तालुकाध्यक्ष राजेंद्र गवांदे , तालुका कार्याध्यक्ष विजयराव खरात , तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब कदम ,करण कोळंगे , बापू रणशूर , विजयराव अडागंळे आदीसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते .

गेले अनेक वर्षे रामदास आठवले यांचा संगमनेर मध्ये मोठा कार्यक्रम होत असल्याने लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने बहुजन समाज्याला रामदास आठवले यांनी शिर्डीतून निवडणुक लढवावी ही भावना सर्वाच्या मनात निर्माण झाल्याने या होणार्या ५ मार्च च्या कार्यक्रमाकडून लक्ष्य लागले आहे . सदर कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी ( अजित पवार ) जेष्ठ नेते दिलीपराव शिंदे , संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष अमोल खताळ , ग्रा प सदस्य सागर भोसले , अॅड. अनिल भोसले , भगवानराव इलग , वैदयकिय सेल जिल्हाध्यक्ष डॉ अशोकराव इथापे , शरदनाना थोरात , कैलास तांबे , नितीन शेजवळ , गुलाबराव सांगळे , भाजपा शहराध्यक्ष अॅड श्रीराम गणपुले , उदयोजक मनिषशेठ मालपाणी , जनार्धन आहेर , माणिकराव यादव , रामभाऊ भुसाळ , साई दूध उदयोजक पांडुरंग आठरे , डॉ. अमोल कर्पे , राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष कपिल पवार , जावेद जहागिरदार , अशोकराव अभंग , सरूनाथ उबरकर , संदिपराव घुगे आदीसह राजकिय , सामाजिक , क्षेत्रासह चळवळीतील कार्यकर्त उपस्थित राहणार आहेत .

तरी होणाऱ्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रिपाई तालुकाध्यक्ष आशिष शेळके , युवकाध्यक्ष योगेश मुन्तोंडे , शहराध्यक्ष कैलास कासार , तालुका कार्याध्यक्ष विजयराव खरात , तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब कदम , तालुका संघटक मधुकरराव सोनवणे , मांग गारुडी आघाडी जिल्हाध्यक्ष अमोल राखपसरे , विजय रोकडे , विजय मुन्तोंडे आदीसह रिपाई कार्यकर्त्यांनी केले आहे .
चौकट
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यकर्ते परिक्षम घेताना दिसत असून गावो गावी जावून निमत्रंण देत कार्यक्रमास येण्याचे आवाहन करत
