संगमनेर । झुंजार न्यूज

संविधान बदल्याचे किती ही आरोप झाले तरी आम्ही असो पर्यत संविधान बदलण्याची कोणाची ही हिंमत नाही विरोधक हे संविधान बदलणार असा अप्रचार करुन लक्ष्य विचलीत करत आहे मात्र २०२४ ला नरेंद्र मोदीचं पुन्हा पंतप्रधान होणार अन् हा पठ्ठ्या पुन्हा मंत्री होणार अशी वल्गना केद्रींय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केली .

 

संगमनेर येथील बस स्थानकासमोरील मैदानात घेण्यात आलेल्या सामाजिक सलोखा परिषद व संविधान सन्मान सोहळ्याप्रसंगी ना . रामदास आठवले बोलत होते . या प्रसंगी माजी मंत्री अविनाश महातेकर , रिपाई प्रदेश उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे , राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव , जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात , जेष्ठ नेते बाळासाहेब गायकवाड , सुनिल मोरे , दिपकराव गायकवाड , प्रकाश लोढे , रिपाई युवा जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे , सुनिल साळवे , रिपाई तालुकाध्यक्ष आशिष शेळके , शहराध्यक्ष कैलास कासार , युवक तालुकाध्यक्ष योगेंश मुन्तोंडे , कैलास शेजवळ , अनिल ननवरे , सुभाष त्रिभुवन , बाबा पंडीत , संदिप मगर , रमेंश शिरकांडे , विजय खरात , बापू रणशूर , गणेश साळवे , रमेश भोसले , विजय कदम , सुधाकर कदम , बाळासाहेब कदम , आदीसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते , महीला , तरुण वर्ग उपस्थित होते .

 

यावेळी ना. रामदास आठवले पुढे म्हणाले की , संगमनेर शहर हे ऐतिहासिक शहर असून मला येण्यास उशिर झाला असताना सुद्धा संगमनेरकरांनी मोठया उत्साहात माझे स्वागत केले या प्रेमापोटी मी भारावून गेलो , उदया मी जर शिर्डीतून उमेदवारी केली नाही तरी मी सदैव तुमच्या पाठीशी उभा राहिल . डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी एकनिष्ठ राहून रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून सर्व जाती – धर्माच्या लोकांना एकसंघ ठेवण्याकरिताचं हा “सामाजिक सलोखा ” घेण्याचा हे मुख्य कार्य आमचे असल्याचे सांगत रामदास आठवले पुढे म्हणाले की , नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशात सबका साथ सबका विकास धरर्तीवर लोकांकरिता कल्याणकारी योजना राबविल्या जात आहे . या सर्वांगीण विकासामुळेचं २०२४ ला पुन्हा नरेंद्र मोदी हे देशांचे पंतप्रधान होतील व हा पठ्ठया पुन्हा मंत्री होईल अशी वल्गना आठवले यांनी केली . 

” तर मराठा समाज्याला आरक्षण मिळावे या मताचा मी असून इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाज्याला ही आरक्षण मिळाले पाहिजेल ” असे आठवले शेवटी म्हणाले .

 

यावेळी अविनाश महातेकर म्हणाले की , सर्व समाज्याने रहावे हे सामाजिक सलोख्यांचे धोरण आहे . रिपाई ला शिर्डीसह सोलापूर या दोन जागा मिळाल्या पाहिजेल अशी कार्यकर्त्यांची भावना आहे शिर्डीतून रामदास आठवले हेचं उमेदवारी करतील .
यावेळी संगमनेर शहरात प्रथमचं आलेल्या प्रख्यात गायिका कडूबाई खरात यांच्या मथुर व बेडधक गाण्यावर तरुणांईसह सर्वांनी ठेका धरल्याचे दिसून आले . 
प्रास्ताविक श्रीकांत भालेराव , आशिष शेळके यांनी केले
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *