आश्वी | झुंजार न्यूज

महापुरुषांच्या विचाराचे प्रबोधन दरवर्षी अनोख्या शैलीतून करून सामाजिक कुशल कार्याद्वारे परिसरात आदर्श निर्माण केलेल्या आश्वी खुर्द येथील भगवान बुद्ध व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समितीने आपला लाखो रुपयाचा निधी गावातील विकास दगडू मुन्तोडे या अडतीस वर्षीय उच्चशिक्षित व सध्या ग्लोबल हॉस्पिटल, परेल मुंबई येथे उपचार घेत असलेल्या तरुणांच्या उपचारासाठी वळवला असल्याची माहिती जयंती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

 

 

या बाबतचे सविस्तर वृत्त असे की, आश्वी खुर्द येथील दगडू मुन्तोडे यांचा मुलगा मुंबई येथील वाडिया हॉस्पिटल येथे पॅरामेडिकल स्टाफ म्हणून कार्यरत असताना त्याला आकस्मिक उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. डॉक्टरांनी त्याला लिव्हर ट्रांसप्लांट करण्याचा सल्ला दिला असून सदर उपचारासाठी तातडीने 25-30 लाख रुपयांची आवश्यकता असल्याचे सांगितले आहे. समाजातील अनेक दानशूर व्यक्ती याकामी पुढे आल्या असून संयुक्त जयंती महोत्सव समितीने देखील आपला निधी वैद्यकीय कारणास्तव विकासच्या उपचारासाठी सुपूर्द करण्याची व्यवस्था केली आहे.

 

आज सम्यक बुद्धविहार आश्वी खुर्द येथे प्रमुख पदाधिकारी यांची बैठक होऊन सदरचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे.

 

स्थानिक लोकप्रतिनिधी यांनाही मदतीसाठी निवेदन देण्यात येणार असून त्यासाठीही बैठकीत निवेदनावर स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या.यावेळी अनिल मुन्तोडे, एकनाथ मुन्तोडे, जगदीश मुन्तोडे, बबन मुन्तोडे, बाळासाहेब मुन्तोडे, कैलास मुन्तोडे, दिनकर मुन्तोडे, बंडू मुन्तोडे, रावसाहेब मुन्तोडे, सुधाकर मुन्तोडे, नंदा मुन्तोडे, सुरेखा मुन्तोडे, आंद्रेस मुन्तोडे, पेत्रस मुन्तोडे यांचेसह कैलास पगारे व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *