संगमनेर । झुंझार न्यूज

अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय, अमृतनगर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विविध योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक सादर केले. कृषी विस्तार विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉ. आगलावे यांच्या मार्गदर्शनाखाली योगसत्राचे आयोजन करण्यात आले.


कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. वाघ, शासकीय कृषी महाविद्यालय, काष्टी-मालेगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) कार्यक्रम अधिकारी व रावे (RAWE) समन्वयक डॉ. राहुल खुळे हे विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. तसेच प्रशासकीय अधिकारी प्रा. जी. बी. बाचकर यांचीही प्रमुख उपस्थिती होती.


यावेळी डॉ. राहुल खुळे यांनी योगाचे शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व विशद केले.  प्राचार्य डॉ. आर. एस. वाघ यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांनी नियमित योगाभ्यास करण्याचे आवाहन केले.


या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या विश्वस्त सौ. शरयूताई देशमुख तसेच संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  अनिल शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *