शासकीय कागदपत्रे गायब असल्याने गुन्हा दाखल करा- गट विकास अधिकारी यांच्याकडे राष्ट्रीय छावा संघटनेचे अध्यक्ष प्रवीण कानवडे यांची मागणी

 

संगमनेर । झुंजार न्यूज

 

तालुक्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या फिरत्या भेटी डायऱ्या सापडत नसल्याने शासकीय कागदपत्रे हरवले असून शोधण्यासाठी पोलीस स्टेशनला गटविकास अधिकारी संगमनेर यांनी रीतसर गुन्हा नोंद करण्याची मागणी राष्ट्रीय छावा संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष प्रवीण कानवडे यांनी केली आहे .

 

याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले की, दिनांक 26. 12 .2023 रोजी माहिती अधिकारात संगमनेर तालुक्यातील घारगाव, बोटा ,निमगाव जाळी, आश्वी खुर्द, जवळे बाळेश्वर, चंदनापुरी, धांदरफळ खुर्द, जवळेकडलग, निमोण, तळेगाव दिघे या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये समक्ष जाऊन माहिती अधिकारात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या फिरत्या भेटी डायऱ्या मागितल्या होत्या.त्यांनतर सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांनी मला लेखी कळविले सदर माहिती व डायरी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर येथे आहे. दिनांक 5.01.2023 रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर यांच्याकडे अर्ज केला. त्यांनी मला सदर माहिती तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती संगमनेर यांच्याकडे उपलब्ध असून इथून माहिती उपलब्ध करून घ्यावी असे दिनांक 25.01. 2024 रोजी कळवले. तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे वारंवार मागणी करून देखील अद्याप पर्यंत माहिती उपलब्ध करून दिली नाही. याचाच अर्थ सदर माहिती या कार्यालयात उपलब्ध नसून ती हरवली आहे म्हणून गटविकास अधिकारी संगमनेर यांना राष्ट्रीय छावा संघटनेच्या वतीने वैद्यकीय अधिकारी यांच्या फिरत्या भेटी डायऱ्या हरवले असून शासकीय कागदपत्रे गायब झाले आहे त्यामुळे आपण वरिष्ठ अधिकारी या नात्याने पोलीस स्टेशनला तक्रार देऊन गुन्हा दाखल करावा अशी मागणी संघटने कडून करण्यात आली आहे. संगमनेर तालुका विस्ताराने मोठा असल्याने या ठिकाणी आरोग्य व्यवस्था खूप काळजीपूर्वक हाताळली गेली पाहिजे. परंतु हे वैद्यकीय अधिकारी स्वतःच्या मर्जीप्रमाणे वागत असून यांना यातून कुठलाही भत्ता भेटत नसल्याने ह्या दैनंदिन नोंद करत नसल्याचे समजते.डायरी नसणारे वैद्यकीय अधिकारी यांचा पगार करू नये असा आदेश असताना देखील तालुका आरोग्य अधिकारी यांनी या अधिकाऱ्यांना पाठीशी घातल्याचे दिसून येते यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची त्यांना साथ असल्याने त्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केल्याचे दिसून येते त्यामुळे या डॉक्टरांवर शिस्तभागाची कारवाई करावी तर यातील काही वैद्यकीय अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या करून किंवा ज्या अधिकारी उपलब्ध आहेत त्यांच्या मागील तारखा टाकून सह्या घेऊन डायरी भरून घेत असल्याची शक्यता असल्याने याची देखील सखोल चौकशी करावी आणि यातील बहुतांशी वैद्यकीय अधिकारी मुख्यालय राहत नसून आपल्या कर्मचाऱ्यांच्या भरोशावर आरोग्य केंद्र सोडून बाहेरच असतात प्रत्यक्षात भेटी दिला असता तेथील कर्मचारी देखील डॉक्टर साहेब मिटींगला आहे, ट्रेनिंगला गेले असे उत्तर देतात रात्रीच्या वेळी तर वैद्यकीय अधिकारी यांनी केंद्रात थांबण्यात गरजेचे असताना देखील बरेच डॉक्टर थांबत नाही तर काही खाजगी दवाखान्यामध्ये जाण्याचा सल्ला देतात एक प्रकारचा हा कार्यामध्ये हलगर्जीपणा असून सर्व डॉक्टरांना शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अन्यथा आमच्या संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल यातून कायदा सुरू असतील जबाबदार निर्माण झाल्यास संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा राष्ट्रीय छावा संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष प्रवीण कानवडे यांनी दिला आहे.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *