श्रीरामपूर । झुंजार न्यूज
गेल्या १३ वर्षापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून भाजपाचे मैत्री संबंध रामदास आठवले यांच्यासह कार्यकर्त्यानी जपले मात्र त्या प्रमाणात रिपाई कार्यकर्त्याना जिल्ह्यात सन्मान मिळाला नाही . सत्तेच्या समीकरणात सत्तेचा वाटा मिळाला नसल्याने कार्यकर्त्यामध्ये मोठी नाराजी असल्याची भावना रिपाई राज्य उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे यांनी व्यक्त केली .
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी रिपाई राज्य सचिव राजाभाऊ कापसे हे होते तर जि प माजी सदस्य दिपकराव गायकवाड , विभागीय प्रमुख भिमा बागुल , युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे , रमेश शिरकांडे , सुभाष त्रिभुवन , आशिष शेळके , सुनिल शिरसाठ , अनिल नन्नवरे , कैलास कासार , बाळासाहेब कदम , अमोल राखपसरे , आंबा नन्नवरे , राजू मगर , स्नेहलताई सांगळे , रमाताई धिवर , ताबोळी , आदीसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते .
यावेळी विजयराव वाकचौरे पुढे म्हणाले की , रामदास आठवले यांना लोकामधून निवडून जाण्याची आवड असल्यानेचं शिर्डी हे त्यांच्या चळवळीपासून त्यांचे लोकांशी जिव्हाळ्याचे संबंध आहे हा मतदार संघ फार मोठा आहे २००९ मध्ये सहकार सम्राटांकडून दगाफटका झाला होता . आता सावध भूमिका घ्यावी लागेल जोपर्यत उमेदवारी जाहीर करत नाही तो पर्यत कोणत्याही नेत्याशी संपर्क ठेवायचा नाही , वाड्यावर जायचे नाही . आपले हितशत्रू जास्त आहे त्यांच्या पासून सावध रहा . अपप्रचार होणार आहे मात्र नाक दाबल्याशिवाय तोंड उघउत नाही , या म्हणी नुसार आठवले यांना उमेदवारी न मिळाल्यास भाजपाच्या उमेदवाराकरिता दरवाजे बंद करु तर दक्षिणेकडे लक्ष्य केद्रींत करु .
राजाभाऊ कापसे म्हणाले की , रिपाई पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून रामदास आठवले यांचे टेटस् कार्यकर्त्यान मोबाईलवरती ठेवन प्रचारास सुरुवात करा टेटस् बघून यांच्या झोपा उडाल्या पाहिजेल व उमेदवारी बाबत विचार झाला पाहिजेल
दिपक गायकवाड म्हणाले की , भाजपा हा आपला मित्र पक्ष आहे . मात्र त्यांची भूमिका रास्त आहे की नाही माहित नाही रिपाई राष्ट्रीय पक्ष असून उमेदवारी न मिळाल्यास वेगळा विचार करावा लागेल . आपण चळवळीतील कार्यकर्ते आहोत . सर्वसामान्य कार्यकर्त्याला सुद्धा सत्तेचा वाटा मिळाला पाहिजेल .
भिमा बागुल म्हणाले की , नेत्याचे आदेश मानणे कार्यकर्ते आठवले यांचा मोठा संघर्ष त्याग आहे २ ००९ नंतर पुन्हा संधी सर्व ताकदीने आवाज उठवा आमच्या नेत्याला उमेदवारी द्यावी एकजुठीनी काम करायचे आहे .
रमाबाई धिवर म्हणाले की , रामदास आठवले आल्यानंतर कार्यकर्त्यामध्ये उर्जा निर्माण होते आठवले च्या उमेदवारी बददल वाड्या वर जावून हट्ट धरु ! जिल्हयालेला रामदास आठवले यांची गरज आहे
