श्रीरामपूर । झुंजार न्यूज
येणार्या लोकसभेच्या निवडणुकामध्ये रिपाई पक्षाला शिर्डी व सोलापूर जागा दया वेळोवेळी ही मागणी करुन सुद्धा भाजपा वरिष्ठांसह विखे पाटील रामदास आठवले यांच्या उमेदवारीबाबत गाभिंर्याने घेत नसल्याची खंत व्यक्त करत बौद्ध समाज्यामध्ये अस्वस्थता निर्माण झाले असून शिर्डी लोकसभा मतदारसंघातून रामदास आठवले यांना उमेदवारी न दिल्यास वेगळा विचार करत नगर जिल्ह्यातील दोन्ही ही लोकसभा मतदारसंघात रिपाईच्या वतीने उमेदवार उभे करणार असल्याचा इशारा रिपाई प्रदेश उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे यांनी दिला .
श्रीरामपूर येथील शासकिय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत वाकचौरे बोलत होते यावेळी रिपाई राज्य सचिव राजाभाऊ कापसे , जि प माजी सदस्य दिपकराव गायकवाड , विभागीय प्रमुख भिमा बागुल , दक्षिण युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे , आशिष शेळके , कैलास कासार , सुनिल शिरसाठ , अनिल नन्नवरे , राजेंद्र गवांदे , रमेश शिरकांडे , बाळासाहेब कदम , अमोल राखपसरे आदी उपस्थित होते .
पत्रकार परिषदेत विजयराव वाकचौरे पुढे म्हणाले की रिपाई पक्षाची गेल्या १२ ते १३ वर्षापासून मैत्रीपूर्वक युती असून प्रामाणिक व नि स्वार्थ पणे ,रामदास आठवले यांच्यासह कार्यकर्ते काम करत आहे संपूर्ण देशासह राज्यात आठवले हे एका समाज्याचे अथवा जातीपुरर्ते मर्यादीत नेते नसून देशात समाज्याला – समाज्याशी जोडण्याचे काम करत आहे सत्तेच्या प्रवाहात आठवले जिकडे तिकडे सत्ता असते हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे संपूर्ण देशात रिपाईचे अस्तित्व निर्माण झाल्याने बौद्ध समाज्यासह बहुजन समाज त्याच्या मागे आहे . ते लोकांमध्ये रहाणारे नेते असल्याने शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढविण्याचे बोलून दाखविले आहे . तेव्हा त्यांना शिर्डी लोकसभेची जागा द्यावी निवडणुकीची संधी न दिल्यास शिर्डीसह राज्यात बौद्ध समाज काम करणार नसल्याची भावना निर्माण झाल्याचे चित्र निर्माण होवून कार्यकर्त्यामधून वेगळा विचार करु असा सूर निघताना दिसत आहे .
जिल्ह्यातील सहकार सम्राटाचे दाखवयाचे अथवा खायचे दात वेगळे असून यांचा अनुभव २००९ मध्ये दिसून आला आहे . तेंव्हा भाजपा वरिष्ठांनी या नेत्यांना तंबी द्यावी . तर शिर्डीतून रामदास आठवले यांना उमेदवारी दयावी ही समाज्याची प्रमुख मागणी असून उमेदवारी न दिल्यास दक्षिण व उत्तरेत उमेदवारी देणार आहे आम्हाला आमचा हक्काचा माणुस हवा असून आम्हाला दोन जागा द्या तुमचे ४० जागा निवडून आणण्यासाठी काम करु !
शिर्डीच्या उमेदवारीबाबत भाजपाने व विखे पाटील यांनी गाभिर्याने घ्यावे . तर जिल्हया – जिल्ह्यातून रिपाई कार्यकर्ते आक्रमक झाले असून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून उमेदवारीबाबत लवकर निर्णय घ्यावा तसेचं वाड्यावर ही उमेदवारीकरिता जिल्ह्याचे कार्यकर्ता जाणार असून . देशाची घटना मजबूत आहे घटना कोणाला ही बदलता येणार नाही विरोधकांनी हा अप्रचार करत लोकामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला असून या भूलभूलैयावर लोकांनी विश्वास ठेवू नये तर इतर नेत्याच्या सांगण्यावरुन बौद्ध समाज्याने अँट्रोसिटी कायदाचा गैरवापर करु नये विनाकारण होणाऱ्या बदनामी आळा घाला
