ही जागा भाजपा , रिपाई , शिंदे गट , कॉग्रेस , ठाकरे गट , वंचित की अन्यय कोण ?

शिर्डी । झुंजार न्यूज 

राज्यातील सहकार क्षेत्राचा बाल्लेकिल्ला म्हणून परिचित असलेला नगर जिल्हा सातत्याने महाराष्ट्रातल्या राजकारणात आणि  सत्तेचा केंद्रबिदू ठरलेला आहे. नगर जिल्ह्यातील आजी – माजी महसूल मंत्री म्हणून ओळख असलेले राधाकृष्ण विखे आणि बाळासाहेब थोरात या नेत्यांची अनेक वर्ष जिल्ह्यासह राज्यातील राजकारणात आणि सत्तेत भक्कम पकड राहिलेली आहे. या अनुषंगाने नगर जिल्ह्यातील दोन लोकसभा मतदारसंघांपैकी विखे आणि थोरात यांचे विधानसभा मतदारसंघ असलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा मतदारसंघ पुनर्रचनेत अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने काहीसा दुर्लक्षित राहिला गेला आहे. मात्र विजयश्री त्यांच्याचं इशाऱ्यावर राहिली आहे .
शिर्डी लोकसभा मतदार संघात विखे, थोरात यांच्यासह काळे, कोल्हे, पिचड यांचे राजकीय वर्चस्व असले तरीही शिर्डी लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने या ठिकाणी व निवडणुकीला उभा असलेला उमेदवार हा विखे किंवा थोरात यांच्या मर्जीतलाचं निवडणूक जिंकण्याची स्वप्न बघतो .
मतदार संघ आरक्षित झाल्यानंतर 2009 रामदास आठवले यांनी या मतदार संघातून उमेदवारी मागितली होती . यापुर्वी राष्ट्रवादी बरोबर युती असल्याने  आठवले पंढरपूर मधून दोन वेळेस निवडून आले मात्र पंढरपूरचा माढा मतदार संघ हा सर्वसाधारण वर्गाकरिता खुला झाला अन् शरदराव पवारांची त्यावर नजर गेली मात्र आठवले यांची सुविधा न करताचं पवारांनी शिर्डीकडे जा म्हणत कॉग्रेसच्या कळपात जाण्याचा सल्ला दिला मात्र कॉग्रेस व राष्ट्रवादीच्या वाटण्यात अनुक्रमे शिर्डी , नगर होते त्यामुळे धुर्त बाळासाहेब विखे यांनी वरिष्ठांशी चर्चा करुन मतदार संघ आदला – बदली करण्याचा प्रस्ताव ठेवला मात्र शरदराव पवार यांनी नकार दिला . त्यामुळे बाळासाहेब विखे पाटील यांचे मनसुंबे फेल गेले . विखेची नगरमधून लढण्याची इच्छा अधुरी राहिली . परिणामी कॉग्रेस – राष्ट्रवादीला दोन्ही ही जागा गमावावे लागल्या तेव्हा पासून आज पर्यत शिवसेना – भाजपानेचं ही जागा ठेवण्यात यशस्वी राहिले तेव्हा शिवसेनेतून भाऊसाहेब वाकचौरे तर भाजपाकडून दिलीप गांधी खासदार झाले . मात्र विखे च्या सल्ला वरुन 2014 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी अचानकपणे पक्षांतर करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवली. अचानकपणे त्यावेळी घडलेल्या या घडामोडीत शिवसेनेला सदाशिव लोखंडे यांना निवडणुकीत उतरावे लागले. काही मोजक्या दिवसांची प्रचाराची संधी असताना सदाशिव लोखंडे हे शिवसेने कडून खासदार झाले आणि त्यांनी काँग्रेसमध्ये गेलेल्या भाऊसाहेब वाकचौरे यांचा पराभव केला. त्यानंतर 2019 ला पुन्हा एकदा शिवसेनेकडून सदाशिव लोखंडे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली. त्यावेळी काँग्रेसकडून आमदार भाऊसाहेब कांबळे त्याचबरोबर अपक्ष भाऊसाहेब वाकचौरे , आप कडून नितीन उदमले यांनी आपले नशीब आजमावले. मात्र या सर्वांना मात देत शिवसेनेचे सदाशिव लोखंडे निवडून आले. मात्र दहा वर्षात लोखंडे हे सर्वसामान्य , दलित , आदीवाशी , शेतकरी , बेरोजगार तरुण , कष्टकरी लोकांकडे फिराकलेचं नाही . त्यामुळे मतदारसंघात नागरिकां मध्ये मोठी नाराजी असल्याचे विविध पातळीवर केलेल्या सर्वेतून समोर आल्याचं बोललं जात आहे. त्यात राजकीय कुरघुड्या मध्ये शिवसेनेत मोठा भूंकप झाला एकनाथ शिंदेसह ५० आमदार व १३ खासदार भाजपाकडे गेल्याने त्यात लोखंडे यांचाही समावेश होता . गेल्या १५ वर्षात दोन्ही खासदारांनी गद्दारी केल्याने मतदारामध्ये नाराजी निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे . ठाकरे गटात उमेदवारीच्या अपेक्षेने गेले वाकचौरे यांच्या उमेदवारीबाबत संभ्रम आहे तर सदाशिव लोखंडे यांचे
राधाकृष्ण विखे यांच्याशी त्यांचे अनेक बाबतीत मतभेद असल्याची चर्चा आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभेत सदाशिव लोखंडे यांचा “पत्ता” कट होण्याची मोठी चर्चा आहे. या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाने शिर्डी लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे खेचून आणण्याकरिता प्रयत्नशील असल्याचे खात्रीशीर माहिती आहे.
खासदार सदाशिव लोखंडे हे 2014 आणि 2019 ला असे सलग दोन वेळी युतीत शिवसेनेकडून शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहे. त्यापूर्वी ते कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ राखीव असताना तीन वेळेस आमदार राहिलेले आहेत त्यामुळे एवढ्या अनुभवी नेत्याला उमेदवारी मिळणार नसेल तर त्याबद्दल निश्चितच खासदार लोखंडे यांना पक्षाकडून शब्द दिला जाईल असे बोलले जात आहे. त्या अनुषंगाने लोकसभेनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत श्रीरामपूर राखीव मतदार संघातून लोखंडे निवडणूक लढवू शकतात. दुसरीकडे रामदास आठवले यांनी अनेकदा शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची
जाहीर इच्छा व्यक्त करत विविध कार्यक्रम घेतले आहे तर आमच्या शिवाय सरकार सत्तेवर येणे अशक्य आहे असे ही बोलू दाखविले आहे . त्या शिवाय बोद्ध समाज्यामधून आठवले यांनाचं उमेदवारी मिळावी म्हणून जोरदार प्रयत्न सुरू असून आठवले यांचा कार्यकर्ता संच ही मोठा असून संपूर्ण भारतात विरोधाभास मेसेज जावू नये म्हणून आठवले यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघ मिळू शकतो असे जाणकारांचे मत आहे .
2024 शिर्डी लोकसभेकरिता अनेक जण इच्छुक असल्याने मोठे डोके दुःखी होवू शकते . तर एन डी ए कडून भाजपा , रिपाई , शिंदे गट यापैकी कोणता पक्ष लढेल हे राधाकृष्ण विखे हेच ठरविणार तर इंडियातर्फ कॉग्रेस , ठाकरे गट , वंचित यापैकी कोणता पक्ष निवडणुक लढविणार हे बाळासाहेब थोरात ठरविणार . असल्याने संध्यातरी रामदास आठवले , सदाशिव लोखंडे , उत्कर्षा रुपवते , भाऊसाहेब वाकचौरे , अशोक गायकवाड , नितीन उदमले , नचिकेत खरात , राजेंद्र वाघमारे यांची नावे चर्चेत आहेत .
चौकट
गुरुवार दि १४ मार्च २०२४ रोजी तर रामदास आठवले यांनाचं उमेदवारी मिळावी म्हणून श्रीरामपूर येथे रिपाई जिल्हा कार्यकारिणीची निर्णायक बैठक होणार असल्याने या बैठकीकडे सर्वाचे लक्ष्य लागले आहे .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *