कर्जत । झुंजार न्यूज
कर्जत शहरातील छत्रपती चौकामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर मुलींचे शासकीय वसतिगृह इमारतीला दर्शनीय ठिकाणी वरच्या बाजूला नामकरण फलक लावण्याबाबत सहाय्यक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कर्जत तसेच कर्जत तहसीलदार तसेच शासकीय वस्तीग्रह अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले
दर्शनीय ठिकाणी नामकरण न झाल्यास सोमवार दि. 18/03/024 रोजी छत्रपती चौक डॉ बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह समोर जाहीर धरणे आंदोलन करणार आहोत कर्जत तालुक्यातील तमाम भीमसैनिक कार्यकर्ते पक्षातील पदाधिकारी आणि आंबेडकरी चळवळीतील विविध क्षेत्रात काम करणारी सर्व हितचिंतक मित्रपरिवार यांनी या आंदोलनामध्ये सहभागी होऊन संबंधित वस्तीग्रह इमारतीला डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह असा दर्शनीय ठिकाणी नामकरण फलक लावण्यासाठी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हा महासचिव सोमनाथ भैलुमे यांनी केले आहे
सदर इमारत बांधकाम जागे अभावी अनेक वर्षे प्रलंबित होते या बांधकामासाठी जागा मिळावी म्हणुन अनेक आंदोलने करून जागा प्राप्त झाली नंतर बांधकाम होण्यासाठी अनेक वर्षे आंदोलने करावी लागली, ही आंदोलने सतत दहा-बारा वर्षे चालू होती. सोमनाथ भैलुमे यांनी हि आंदोलने जिल्हा मागासवर्गीय विद्यार्थी संघटनेच्या वतीने सुरु केले होते
तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तालुका अध्यक्ष असताना या आंदोलनाचा शेवट झाला, याकामी संघर्ष करत असताना सोमनाथ भैलुमे सह गोदड समुद्र, पिंटू गोरे नवनाथ भैलुमे नवनाथ घोडके बापू भवर, शिवा भैलुमे, प्रदीप समुद्र छगन समुद्र, कालकथित बाळू एकनाथ भेलुमे अशी अकरा भीमसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.हा कोर्टातील संघर्ष चार वर्षे चालू होता. अँड आनंद साळवे यांनी या अकरा भीमसैनिकांनच्या बाजूने मोफत केश लढवली आणि आमची कोर्टातून निर्दोष मुक्तता केली.या संघर्षामुळे 22 कोटी रुपयाचा निधी या इमारतीस प्राप्त झाला आणि ती इमारत पूर्ण झाली आज दोन वर्षे झाली त्या ठिकाणी मुलींचे शासकीय वस्तीग्रह सुरू आहे. या संघर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,काँग्रेस पार्टी, रिपब्लिकन पार्टी ,वृद्ध भूमीहीन शेतकरी शेतमजूर संघटना, टायगर फोर्स ,भारतीय बौद्ध महासभा अशा अनेक पक्ष संघटनांनी आमच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन आमच्या संघर्षासाठी मोठे बळ दिले होते. आज कर्जत शहरातील विकास कामात ही एक मोठी भर कर्जत शहराच्या सौंदर्यामध्ये दिसून येते या भल्या मोठ्या इमारतीला नामकरण फलक वरच्या बाजूला दर्शनीय ठिकाणी असायला पाहिजे जेणेकरून ग्रामीण भागातून आलेल्या पालकांना विद्यार्थ्यांना ती इमारत सहज आणि स्पष्ट दिसून येईल,
सोमवार दि 18 मार्च 024 रोजी धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे या आंदोलनात आपण सर्वांनी सहभागी होऊन पालक आणि विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या अडथळ्याला न्याय देण्यासाठी जिल्हा महासचिव सोमनाथ भैलुमे जिल्हा संघटक संजय शेलार,आमचे मार्गदर्शक प्रा विक्रम कांबळे सर,जिल्हा उपाध्यक्ष लखन पारसे फादर कमिटी जिल्हा सल्लागार चंद्रकांत डोलारे, विकास समुद्र,गोदड समुद्र, प्रदीप समुद्र दत्ता घोडके , कृष्णा गिरी, संजय भवर आदीं पदाधिकारी निवेदन देण्यासाठी उपस्थित होते.
अशी माहिती वंचित बहुजन युवा आघाडी कर्जत शहर नेते विकास समुद्र यांनी दिली.
