कोपरगांव । झुंजार न्यूज

कोपरगाव तालुक्यातील देर्डे कोहाळे येथील प्रसिद्ध वकिल अॅड. विलास बाबुराव गोरे यांची भारत सरकारच्या नोटरी पदी नियुक्ती झाली . 

 

अॅड गोरे हे गेल्या 25 वर्ष पासून कोर्टात चांगल्या प्रकारे वकीली व्यवसाय करत असून वक लीच्या माध्यमातून गोर-गरिबांना , कष्टकऱ्यांना ,  शोषीत व दुःखी पिडीतांना , न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांची मागील वर्षी ऑनलाइन पद्धतीने ” नोटरी करिता ” मुलाखत घेण्यात येवुन निवड करण्यात आली आहे 

अॅड गोरे यांची नोटरी पदी निवड झाल्या बद्दल रिपाई एकतावादी जिल्हाध्यक्ष अॅड. किरणभाऊ रोहोम, जिल्हा-उपाध्यक्ष केशवराव विघे , अॅड यतिनभाऊ औताडे , संतोष दळवी (मामा) यांच्यासह वकील संघटना , रिपाई एकतावादीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले असून विविध क्षेत्रातून अॅड‌ गोरे यांचे कौतुक होत आहे. 
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed