संगमनेर । झुंजार न्यूज

 

आकाशात उंच भरारी घेणा-या गरूडलाही पाण्याचे एका थेंबासाठी खाली यावे लागते परंतु खाली येणे ही काय त्याची हार नसते तर पुन्हा उंच भरारी घेण्यासाठीची तयारी असते असे एक प्रतिभावंत व्यक्तीमत्वांचा !… खळी ता.संगमनेर जि.अहमदनगर येथिल छोट्याशा शेतकरी कुटुंबात स्वर्गीय पाराजी धोंडींबा चकोर पाटील यांचा वडील स्वर्गीय रखमाजी पाटील चकोर आणि आई-जनाबाई यांचे पोटी सन-1/06/1924 रोजी खळी येथे जन्म झाला.स्वर्गीय पाराजी पाटील चकोर यांचे पूर्व प्राथमिक शिक्षण खळी ता.संगमनेर येथे झाले.म्हणतांत ना ‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ‘

 

त्याप्रमाणे अतिशय कुशाग्र बुद्धि हुशार,शांत संयमी मनमिळावू विनम्र स्वभाव यामुळे बालपणीच शालेय जिवनात त्यांना समाजकार्याची आवड निर्माण झाली.आपल्या लहान सोंगडी मित्रांना बरोबर घेऊन गावातील अखंड हरिनाम सप्ताह,धार्मिक कार्यात सहभाग घेत कार्यक्रम यशस्वी करत.बालपणापासूनच जिद्दी असल्याने मनात एखादी गोष्ट बसली की,ती पूर्णत्वास जाण्यासाठी आटोकाट प्रयत्न करित त्यात यश संपादन करणे हेच पहिले ध्येय असे.त्यामुळे खळी गावात तरुण, युवकांना बरोबर घेत जेष्ठांचेही संघटन करण्यात स्वर्गीय पाराजी पाटील चकोर यशस्वी ठरले.स्वामी विवेकानंदाचे काही वाक्य स्वर्गीय पाराजी पाटील चकोर यांचे जीवनपटास निश्चित लागू पडतात .स्वामी विवेकानंद म्हणायचे की,’माणसे प्रेम करण्यासाठी असतात आणि पैसा हा वापरण्यासाठी असतो.परंतु हल्लीचे युगात गडबड अशी झाली आहे की,पैशावर प्रेम केले जात आहे आणि माणसे वापरली जात आहे.माणसं माणुसकी सोडत आहे आज माणसे एकमेकांवर प्रेम करत नाही थोरां मोठ्यांचा आदर ठेवत नाही हे अंतिम सत्य आहे.त्याप्रमाणे जशी आज रस्त्याने चालणारी पैशाने श्रीमंती असलेले माणसे आपणास अनेकदा भेटतील परंतु मनाची श्रीमंती असलेली माणसे भेटणार नाही अगदी तसेच काहिसे स्वर्गिय पाराजी पाटील चकोर यांचे बाबतीतही तसच झाले. त्यांनी आपल्या संपुर्ण आयुष्यात पैशाची श्रीमंती असलेली माणसे नाही तर मनाची श्रीमंती असलेली लाख मोलाची माणसे कमविलि हिच खरी त्यांची श्रीमंती होय.खळी हे डोंगराळ भागात वसलेले एक गाव!तिथे पिण्यासाठी पाणी नव्हते त्यामुळे शेती करणे तर खुप दूरची गोष्ट होय.आपल्या गावात यासाठी काय करता येईल या विचाराने स्वर्गीय पाराजी पाटील चकोर कायम बेचैन आणि उदास असे.ते समाजकारण,राजकारण,शिक्षण आणि धार्मिक कार्यात सदैव अग्रभागी होत.थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी स्वर्गीय भाऊसाहेब थोरात (दादा) यांचे पुरोगामी विचाराची कास धरुन समाजकार्याचा श्रीगणेशा स्वर्गीय पाराजी चकोर पाटील यांनी केला.गावची मुख्य समस्या पाणी याबाबत स्वर्गीय भाऊसाहेब थोरात दादां यांचेकडे या मागणीसाठी पाठपुरावा चालू केला आपला एक सहकारी कार्यकर्ता म्हणून स्वर्गीय दादांनी पाट पाणी लिफ्टला त्यावेळी मंजुरी दिली. आणि खळी गावचा कायमचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला.पिण्या साठी लागणारे पाणी मिळाले त्यासाठी महिलांना जी पाण्यासाठीची हलपेष्टा सहन करावी लागत होती ती कायमची संपविण्यात यश मिळाले तसेच शेतीसाठी पाणी उपलब्ध नव्हते. त्यामुळे शेती असुन देखील काय उपयोग ? या पाण्यामुळे शेती सुरु झाली आणी बघता-बघता ओसाड खळी गावचा चेहरा बदलला.शेती आणि परिसर ओलिताखाली आली आणि येथिल शेतकरी पाणी आल्यामुळे आता शेती करू लागला. गावाचे ओसाड माळरानाचे रुपांतर एका बागायति शेतीमध्ये झाले,हरीत क्रांति झाली खळी गावची नवीन ओळख झाली.गाव सुजलाम-सुफलांम होण्यासाठी स्वर्गीय सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांची बहुमोल त्यांना साथ मिळाली. खळी हे ग्रामीण खेडे गाव होय.या भागात शिक्षणाची गैरसोय होती .येथिल विद्यार्थी,विद्यार्थीनीना यासाठी शिक्षणासाठीचे त्यांचे समोर मोठे आवाहन निर्माण झाले होते.माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षणासाठी आश्वि,प्रवरा नगर येथे दुर जावे लागत असे ही समस्या ओळखून स्वर्गीय पाराजी पाटील यांना थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांचा सहवास लाभला.त्यांचे नेतृत्वाखाली समाजकारण,राजकारणात श्रीगणेशा केला आणि कार्यास सुरुवात केली.खळी येथे आपल्या गावातील दुध उत्पादक शेतकरी यांना दुध घेऊन पायी किंवा सायकलवर दुरवर आश्वि येथे जावे लागत ही फार मोठी कसरत दुध उत्पादक शेतक-यांना करावी लागत त्यामुळे दुध उत्पादक शेतकरी आणि त्यांचे घरातील महिला यांची कुचंबना होत होती म्हणून आपल्याच गावात सहकारी दुध संस्थेची स्थापना केली आणि दुध दुसरीकडे ,इतरत्र न घेवुन जाता आपले दुध संघात आणण्यात आले त्यावर प्रक्रिया क रुन दुध व दुग्ध पदार्थाची निर्मिती करण्यात आली.याचा फायदा दुध उत्पादकांना झाला. शिक्षणासाठी स्वर्गीय सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात (दादा) यांचे मार्गदर्शनाखाली आणि त्यांचे प्रयत्नातून खळी येथे सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक शिक्षण समाजाचे,सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात या नावाने माध्यमिक विद्यालय सुरु केले आणि पवित्र ज्ञान मंदीराची उभारणी केली. त्यासाठी फार कष्ट घ्यावे लागले या कामी गावचे ग्रामस्थ,नागरिकांचे बहुमोल सहकार्य लाभत गेले.याच कार्यामुळे स्वर्गीय पाराजी चकोर पाटील यांनी गावातील ग्रामस्थ,नागरिकांची मने जिंकली गावात होत असलेल्या विकास कार्यात मोलाची साथ स्वर्गीय पाराजी पाटील यांना लाभत गेली.विकासाचा रथ आगेकूच झाला.खळी ग्रामस्थांनी 1972 ते 1977 या खळी ग्रामपंचायत सरपंच म्हणून निवड केली याच विकास कार्यामुळे त्यांचेकडूंन ग्रामस्थांच्या अपेक्षा वाढल्या आणि शेतकरी यांची विकासाची कामधेनु म्हणून खळी गावचे सन-1978 ते 1983 काळात विविध कार्यकारी सोसायटी खळी,चेअरमनपद मिळाले त्या माध्यमातुन शेतकरी सभासद यांचे हीत जोपासून त्यांना आर्थिक सक्षम बनवीले.म्हणुन ग्रामस्थांनी सन-1986 पाराजी पा.चकोर सह.पतसंस्था मर्या. खळी ग्रामस्थांनी पतसंस्थेची स्थापना करुन त्यांचा गौरव केला. प्रथमपासुन साधी राहणी शर्ट धोतर आणि डोयी भरजरी फेटा असा त्यांचा साधा पेहराव असे.कपडे नेहमी स्वछ घालत असत.कुटूंबात सदस्यांचा जसे एकमेकांचा आदर सन्मान करत अगदी त्याचप्रमाने गावातील ग्रामस्थ,हे देखील आपलेच कुटंबातील आहे असे समजुन सर्व घटकांतील समाजाला एकत्र घेऊन बरोबर चालायचे यासाठी अग्रक्रम असे.गावातील प्रत्येकांचे सुख दु:खाशी कायम सहभागी होत म्हणून पाराजी पाटील हे सर्वांनाच आपलेसे वाटत गावातील लहान-मोठा त्यांचा आदर नेहमी करित.सर्व सामांन्य माणसाचा प्रश्न कोणताही असो तो तातडीने मार्गी लावत त्यामुळे जो काही आनंद मिळायचा त्याचा स्वर्गीय पाराजी पाटील चकोर यांना खुप आनंद व्हायचा.सर्व सामांन्यांचे हीत नेहमी जपण्याचे कार्य अखेरपर्यंत पाराजी पाटील यांनी केले.अनेक गरिब लोकांचे संसार,घरे उभे केले तर काही घरे तोडण्यापासुन वाचविण्याचे काम त्यांनी सतत केले तसेच गरिबांचे मुलीचे लग्नात कन्यादान करण्याचेही काम करुन पित्याची भुमिका निर्विवादपणे पार पाडली. काहीं मुलींचे संसारीक वाद मिटवुन दोघात,पती आणि पत्नीस समजावून सांगत त्यांचेंत समेट घडवून आणले अनेक अशा मुलींना सासरी नांदविणेसाठी त्यांनी मोलाची मदत केली.हे करत असतांना त्यांनी गोर -गरिबांचे संसार वाचविण्याचे काम केले. गावातील लहान ते मोठ्यापर्यंत ते अखेरपर्यंत मार्गदर्शक म्हणून राहिले.

 

खळी गावचे विकासात त्यांनी बहुमोल असे योगदान देवून खळी गावचे विकासाचे खरे चित्र प्रत्यक्षात साकारले आणि विकासाचे शिल्पकार होण्याचा बहुमान त्यांना मिळाला हे आजही खळी गावातील नागरिक खाजगीत त्यांचे या कार्याची चर्चा करतात.स्वर्गीय सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात दादा यांचे मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील राजकारण,समाजकारण करण्याची संधी स्वर्गीय पाराजी पाटील यांना मिळाली.या संधिचा फायदा त्यांना खळी गावचे विकासासाठी झाला.स्वर्गीय सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात (दादांचे) जूने सहकारी मित्र म्हणून कायम सन्मान राखला. राज्याचे लोकप्रिय नेते,कॉंग्रेस विधी मंडळ नेते, मा.महसुल मंत्री,आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांचे एकनिष्ठ सक्रिय कार्यकर्ते झाले.स्वर्गीय दादांचे विश्वासू सहकारी म्हणून थोरात साहेबांनी देखील त्यांना तालुक्याचे राजकारणात स्वर्गीय पाराजी धोंडीबा चकोर पाटील यांना प्रथम सन-1994 साली संगमनेर साखर कारखाना संचालक पदी विराजमान केले हाचा त्यांचा सन्मान केला.

 

त्यांचे राजकीय,सामाजिक कार्याची दखल घेत महाराष्ट्रातील उच्च स्थानी असलेल्या सहकारातील एक अग्रगण्य संस्था म्हणून संगमनेर तालुका सहकारी दुध उत्पादक व प्रक्रिया संघ संगमनेर येथे संचालक म्हणून सन-2003 ते 2008 या दरम्यान संगमनेर तालुक्याचे युवा नेते मा.रणजितसिंह देशमुख साहेब यांचे बरोबर संचालकपदाची त्यांना संधी दिली.मा.रणजितसिंह देशमुख साहेब यांनी देखील स्वर्गीय दादांचे जुने सहकारी मित्र म्हाणुन कायम त्यांना सन्मान दिला.मा.रणजितसिंह देशमुख साहेब यांचे सहकार्यामुळे स्वर्गीय पाराजी पाटील यांना दुध संघाचे व्हाईस चेअरमनपदी सन-2013 ते 2015 या काळात संधी मिळाली.याही काळात मा.रणजितसिंह देशमुख साहेबांनी त्यांना संघाचे कामात येणा-या प्रत्येक अडचणीच्या वेळी योग्य मोलाची साथ देत मार्गदर्शन केले. व्हाईस चेअरमन म्हणून आपल्या सर्व सहकारी यांना बरोबर घेऊन एका विचाराने दुध संघाचे कामकाज केले आणि यशस्वी व्हाईस चेअरमन म्हणून नावलौकिक मिळविला. संघातील कर्मचारी,सेवक यांना कायमच प्रथम स्थानी मानुन आदराची वागणूक त्यांनी दिली त्यामुळे संघातील अधिकारी,कर्मचारी सेवक यांना देखील स्वर्गीय पाराजी धोंडींबा चकोर पाटील यांचे बद्दल आदर होता.दादांचे जुने सहकारी म्हणून आदरणीय आमदार थोरात साहेबांनी स्वर्गीय पाराजी धोंडींबा चकोर पाटील यांचा सन्मान सोहळा करण्याचे ठरविले आणि वयाचे 98 व्या.वर्षी सन-6/05/2022 रोजी स्वर्गीय पाराजी धोंडिबा चकोर पाटील यांचा अभिष्ठचिंतन,सन्मान सोहळा त्यांचे खळी गावी मोठ्या दिमाखात साजरा केला.त्यात त्यांनी केलेले कार्याची आठवणींना उजाळा देणेसाठी त्यांनी समाजकारण,राजकारण,समाजसेवेसाठी आपले संपुर्ण आयुष्य खर्ची केले यावर आदरणिय आमदार थोरात साहेबांनी स्वर्गीय पाराजी चकोर पाटील यांचा गुणगौरव करुन खळी गावचा आज जो काही चेहरा-मोहरा बदलला तो स्वर्गीय पाराजी पाटील यांचे मुळेच!..जुने माणसे ही खुप वैचारीक,शब्दाला पक्की होती.एकदा की त्यांचेवर जबाबदारी टाकली की ती पुर्ण करत अशी थोर जेष्ठ माणसे बदलत्या काळात आता राहिली नाही याबाबत खंत आहे. आजच्या तरुण पिढीने जेष्ठांचा आदर करत त्यांचे कडुन प्रेरणा घेणे आवश्यक आहे.म्हणून त्यांचा गौरव करत उर्ववरीत आयुष्य त्यानां आनंदी आणि सुखकारक,निरोगी चांगले जावे म्हणून शुभेच्छा देवुन सन्मानीत केले. हा त्यांचे आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग होता.यांना दोन मुले पैकी थोरला भास्कर हा अतिशय शांत,संयमी,सुसंस्कृत मनमिळावू स्वभाव तोही वडिल स्वर्गीय पाराजी चकोर पाटील यांचा राजकीय वारसा बाळगून आपली शेती सांभाळुन चालवीत आहे.

 

समाजकारण,राजकारण,धार्मिक,शिक्षण,पत्रकारिता क्षेत्रात सदैव अग्रेसर आहे.सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात माध्यमिक विद्यालय स्थानिक स्कूल कमेटी खळी येथे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे तसेच सोनगाव येथिल प्रगती पथवार असलेल्या मंदना नागरी सह.पतसंस्थेच्या संचालक मंडळावर संचालकपदी विराजमान आहे. तर दुसरा.श्री.मच्छिंद्र हा खळी गावचे कामगार पोलिस पाटील म्हणून समाजकारणात यशस्वी कामगिरी पार पाडतोय.हे बाळ कडू वडील स्वर्गीय धोंडींबा चकोर पाटील यांचेकडून त्यांना मिळाले.स्वर्गीय पाराजी चकोर पाटील यांचे शेवट च्याकाळात त्यांना मुले,सुना,नातु,नाती या सर्वांनी अखेरपर्यंत खुप सेवा केली. सहकारातील एक सच्चा,स्वर्गीय दादांचा सहकारी मित्र,जेष्ठ कार्यकर्ता म्हणून राज्यांचे मा.महसुल मंत्री मा.आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांनी स्वर्गीय पाराजी धोंडींबा चकोर पाटील यांचे वयाचे 98 व्या वर्षी त्यांचे खळी गावी दि.6/05/2022 रोजी भव्य असा त्यांचा दिमाखदार आभिष्टचिंतन सोहळा साजरा करण्यात आला. त्या कार्यक्रमात त्यात अनेक मान्यंवरांनी त्यांचे कार्याचा लेखा-जोख मांडला. त्यांचा जिवन प्रवास अतिशय संघर्षमय, सुखकारक हसत-खेळत,कुटंबाबरोबरच, समाजसेवा करत स्वर्गीय पाराजी पाटील यांनी आपले संपुर्ण आयुष्याला जनसवेसाठी खर्च केले मानव सेवा हिच खरी ईश्वर सेवा असे ते सांगत त्यानी आयुष्याला अखेरचा पूर्णविराम दिला.दि.11/03/2024 हा त्यांचा जन्म दिवस आजच ख-या अर्थाने त्यांना वयाची 100 वर्ष पुर्ण झाली होती.एकीकडे त्यांचा शतक पूर्ती आभिष्ठचिंतना निमित्त शताब्दी साजरी करण्याऐवजी मृत्यूला सामोरे जात त्यांना अखेर मृत्युने कवटाळले अंतिम संस्कार करण्याची वेळ आली. त्यांना कवटाळले आज अखेर सायं. 7.30वा. स्वर्गीय पाराजी धोंडींबा चकोर पाटील,यांनी आपल्या कुटुंबासह मित्र परिवार,आणि खळी गावचा निरोप घेतला.

 

खळी गावचे विकासाचे एक पान सहजगत्या गळून पडले.गावात आणि पंचक्रोशीत त्यांचे निधनाची वार्ता. वा-यासारखी पसरली आणि गाव परिसरात स्मशान शातंता पसरली.गाव शोकसागरात बुडाले या दु:खद घटनेमुळे हळ-हळ व्यक्त करण्यात आली.त्यांचे जिवनपट उलगडतांना त्यांनी केलेले अनमोल असे खळी गावचे विकासाचे कार्य कायम स्मरणात राहिल.त्यांचे प्रति माझे शब्दरुपी भाव पुष्प अर्पण करतो आणि त्यांनी केलेल्या या उतुंग कार्यास सलाम करुन शब्दरुपी आदरपूर्व भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

– सुभाष हळनोर 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed