पानोडी । झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्यातील पानोडी येथे दलित वस्ती अंतर्गत काँक्रीटीकरण रस्ता ,वॉटर फिल्टर व बंदीस्त गटारी अशा विविध विकास कामांचा संरपच गणपत हजारे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आले .

लोकसभा निवडणुकीच्या आचार सहिंता लागण्यापुर्वी बहुतांश ठिकाणी मंजूर झालेल्या कामाचा शुभारंभ करण्यात आल्याचे दिसून आल्याने पानोडी गावांतील दलित वस्तीकरिता २२ लाखांचे विविध विकास कामाचे ही शुभारंभ करण्यात आले . 

यावेळी उपसंरपच तथा संगमनेर दूध संघाचे संचालक विक्रम थोरात , माजी उपसंरपच अशोक तळेकर , रिपाई तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब कदम , रिपाई सरचिटणीस नानासाहेब कदम , स्वप्नील कदम , ग्रामसेवक सुरेंद्र बाह्मणे , ग्रा प सदस्य दिनकर कदम , मधुकर कदम आदीसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते . 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *