अहमदनगर । झुंजार न्यूज
लोकसभा निवडणुकीच्या पावभूमीवर महायुतीकडून शिर्डी लोकसभेसाठी ना. रामदास आठवले यांची उमेदवारी जाहीर होत नसल्याने दक्षिणेतील पदाधिकाऱ्यांनी शहरात बैठक घेवून त्यांची तातडीने उमेदवारी जाहीर होण्यासाठी तीव्र भावना व्यक्त केल्या
तर २०१० पासून महायुतीबरोबर असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला आठवले यांची उमेदवारी जाहीर करा अन्यथा दक्षिणेतून उमेदवार उभा करण्यात येईल : जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे
रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपाईला सत्तेत वाटा देण्यासाठी शिर्डी व सोलापूरची जागा देवून त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले. या दोन्ही जागेवर विचार न झाल्यास रिपाईसह संपूर्ण आंबेडकरी अनुयायी वेगळा विचार करणार असल्याचा इशारा सुनिल साळवे यांनी रिपाईच्या झालेल्या बैठकीत दिला असून दक्षिण मधून अपक्ष उमेदवारी करणार
Post Views: 786
