राहुरी । झुंजार न्यूज

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील तथा केद्रींय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा सर्वगुण संप्रन्न व परखड व्यक्तिमत्त्व असणारे मा.श्री.सुरेंद्रभाऊ थोरात यांचा अभिष्टचिंतन सोहळा निमित्ताने सोमवार दि. १ एप्रिल २०२४ रोजी विविध शिबिरे ,सांस्कृतिक व व्याख्यानाच्या माध्यमातून देवळाली बाजार तळ येथे भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे .

यावेळी सकाळी 9.00 वा. हृदयरोग व अस्थिरोग मोफत तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले असून डॉ. राहुल गुट्टे MBBS, MD (Medicine) ( हदयरोग तज्ञ ) , डॉ राहुल सुपेकर ( अस्थिरोग तज्ञ ) , डॉ. सागर कोतकर , डॉ. मन्सुर सय्यद ,डॉ. अण्णासाहेब मासाळ , डॉ. दादासाहेब शिंदे , डॉ. भागवत वीर , डॉ. नितीन नेहे ,डॉ. किशोर वाघमारे , डॉ. प्रविण कोठुळे या तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत हृदयरोग, हृदयविकार (उच्च रक्तदाब), ब्लड शुगर, ब्लड प्रेशर, ईसीजी, पल्स रेट/ ऑक्सिजन लेव्हल, उंची व वजन, अस्थिरोगांसंदर्भातील आजार (पाठ, कंबर, मणके, मान, गुडघेदुखी) इ. आजारांची तपासणी केले जाईल . तसेच रोटरी क्लब राहुरी मार्फत भव्य रक्तदान शिबिर होईल .

तर सायं. ७ वा गणित तज्ञ मा. विठ्ठल कांगने सर यांचे व्याख्यान , सायं. ८ वा . गोरगरीब महिलांना साडी वाटप , रात्री ८:३० वा . तरुणांचे ऑयडॉल सुरेंद्र थोरात यांचा सामाजिक , राजकिय , व्यावसायिक , सहकार क्षेत्रातील व चळवळीतील मान्यवरांच्या उपस्थित भव्य नागरी सत्कार होणार आहे .

तरी होणाऱ्या अभिष्टचिंतन सोहळ्यास जिल्हयातील विविध क्षेत्रातील जेष्ठ व तरुण कार्यकर्त्यानी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे .

