{"remix_data":[],"source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

शिर्डी । झुंजार न्यूज

2024 लोकसभा निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले आहे. शिर्डी आणि दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाड़ी असा सामना रंगतोय. शिर्डी मतदारसंघातून शिंदे गट शिवसेनेचे उमे‌द्वार सदाशिव लोखंडे निवडणूक रिंगणात पुन्हा उतरले आहेत, तर दक्षिण नगरमध्ये महायुतीचे ( भाजपा ) डॉ सुजय विखे पाटील निवडणूक लढवीत आहेत. महायुतीच्या उमे‌द्वारांनी प्रचारास सुरुवात केली असली तरी महायुतीतील महत्वाचा घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टीला दोन्ही उमे‌द्वार विश्वासात घेत नाहीत, मानसन्मान देत नाहीत. बेरोजगार तरुणांना नोकऱ्या रोजगार देण्यात देखील अपयशी ठरले आहेत. दरवेळी निवडणुकीत फक्त मतांसाठी गोंजारतात, नंतर दूर करतात, अशी नाराजी रिपाई जिल्हा कार्यकत्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे . 
महायुतीच्या शिर्डी व दक्षिण नगर लोकसभाच्या प्रचारात जोपर्यंत मान सन्मान मिळत नाही तोपर्यंत प्रचारात सहभागी होणार नाही अशी भूमिका घेण्यात आली. भाजपचा मित्रपक्ष म्हणून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नेहमीच सहयोगाची भूमिका बजावली आहे. पुन्हा देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांना विराजमान करण्यासाठी कामाला लागावे असे आदेश रामदास आठवले यांनी संपुर्ण राज्यात दिले मात्र शिर्डी मधून रामदास आठवले निवडणुकीकरिता इच्छुक होते . त्यानुसार गेल्या दोन वर्षांपासून रामदास आठवले हे विखेना सोबत घेऊन कार्यक्रम करत होते . साध्या – भोळ्या आठवले यांना विखेच्या मनातील समजलेचं नाही . अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न करुन ही शिर्डी , सोलापूर या मागितलेल्या जागा मिळाल्याचं नाही त्यामुळे बौध्द समाज्याच्या मनाला ठेच पोहचली गावो गावी असणाऱ्या बौध्द समाज्यासह आठवले यांना मानणाऱ्या बहुजन समाज्यात नाराजी पसरली . ही नाराजी स्थानिक असणाऱ्या नेत्याबद्दल आहे यांना रामदास आठवले यांचे गुणधर्म चालतात , मते चालतात मग प्रतिनिधीत्व करण्यासाठी का ? नाही चालत हे पडलेले मोठे कोडे आहे असे विजयराव वाकचौरे यांनी म्हटले आहे . 
नगर जिल्हयात अनेक वर्षापासून रिपाईची अवहेलना होत आहे मित्र पक्षाच्या स्थानिक नेत्याकडून कार्यकर्त्याना कधी ही विश्वास घेतले गेले नाही मान-सन्मान दिला गेला नाही, कोणत्याती प्रचार अथवा कार्यक्रम नियोजनात सहभागी करून घेत नाहीत, असा नाराजीचा सुर कार्यकत्यांनी आवळल्याचे दिसून येत आहे. यावेळी पत्रकारांशी बोलताना रिपाई नेते विजयराव वाकचौरे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर महायुतीचा मित्रपक्ष म्हणून रिपाईची भूमिका महत्त्वाची ठरणार असून रामदास आठवले यांच्या उपस्थितीत गुरुवारी होणाऱ्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे . 
महायुतीचे शिर्डी व दक्षिण नगर लोकसभा उमेद्‌वारांकडून कार्यकत्यांना मान-सन्मान मिळत नसल्याची खंत कार्यकर्त्यामध्ये आहे. गेल्या १५ वर्षात शिर्डीतील खासदारांनी बौद्ध समाज्यातील किती समस्या सोडविल्या , किती निधी दिला , वाड्या – वस्त्यावर किती वेळा गेले एक ही उत्तर देता येणार नाही आता प्रत्येक कार्यकत्यांना न्याय मिळू पर्यंत तटस्थ राहण्याची भूमिका होणार आहे आमचे ठरले आता झालेल्या अपमानाला चोख उत्तर देणे .
रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांची गुरुवारी भेट घेऊन कार्यकर्त्यांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहचविणार आहोत असे सांगण्यात येत असून स्थानिक नेते हे निवडणुकीत रिपाई कार्यकरांचा फक्त वापर करून घेततात , गरज सरो आणि वैद्य मर ही भूमिका आम्ही यापुढे चालू देणार नाही. रिपाईच्या या आक्रमक भूमिकेमुळे शिर्डी व दक्षिण नगर महायुतीचे उमेदवारांचे टेन्शन वाढणार का हेच पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed