नाशिक । झुंजार न्यूज
जिल्ह्यातील पेठ तालुक्यात आमदार सत्यजीत तांबेंचा मंगळवारी दौरा संपन्न झाला. आमदार झाल्यापासून सत्यजीत तांबे मतदारसंघात सतत दौरा करत आहेत. नागरिकांच्या विविध समस्यांना जाणून घेण्यासाठी आणि त्याला वाचा फोडण्यासाठी ते मतदारसंघातील सर्व जिल्ह्यात दौरा करत आहेत. दौऱ्यादरम्यान, पेठ तालुक्यातील निरगुडे, चाचडगाव, वांगणे, उस्थळे, करंजाळी इत्यादी ठिकाणाला भेट दिली.

ग्रामविकास मंडळ संचालित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा निरगुडे व चाचडगाव येथील जनता सेवा मंडळ नाशिक संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या शाळेला भेट दिली. यावेळी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधून शाळेतील आठवणींना उजाळा दिला. पेठ तालुक्यातील नगरपंचायत, शैक्षणिक संस्था, संघटना, महाविद्यालय व नागरिकांची आ. सत्यजीत तांबेंनी भेट घेतली. तसेच नगरपंचायतीतील नगराध्यक्ष करण करवंदे आणि नगरसेवकांनी आ. तांबेंचे स्वागत केले. याशिवाय विविध विकास कामांवर चर्चा केली.

डांग सेवा मंडळ संचालित दादासाहबे बिडकर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, (पेठ) महाविद्यालयाला शैक्षणिक वर्ष २०२३-२४चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा उत्कृष्ट महाविद्यालय (ग्रामीण) पुरस्कार मिळाल्याबद्दल महाविद्यालयाची भेट घेऊन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक आ. सत्यजीत तांबे यांनी केले.

याप्रसंगी, नगरसेवक मनोज घोंगे, विजय धूम, गणेश गावित, गणेश वळवी, राहुल चोथवे, अलका कस्तुरे, शितल राहणे, रामदास गायकवाड, राजू गायकवाड, महेंद्र जाधव यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
चौकट
पेठमध्ये उभारणार ‘जयहिंद युथ क्लब’
पेठ तालुक्यात जयहिंद युथ क्लबसाठी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. युथ क्लबच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा केंद्र, वाचनालय, अभ्यासिका असलेलं अत्याधुनिक भव्यदिव्य असं ‘जयहिंद युथ क्लब’ बांधले जाणार आहे.
पाच जिल्ह्यांचा दौरा अजूनही निरंतर सुरूच
आमदार झाल्यापासून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. एका वर्षात पाच जिल्ह्यांचा आभार दौरा १५९ दिवसांत पूर्ण केला. यात ५४ तालुक्यांचा आभार दौरा करताना किमान ५० हजाराहून अधिक किलोमीटरचा प्रवास केला. तरीही आभार मानण्यासाठी मतदारसंघाचा दौरा अजूनही निरंतर सुरूच आहे.
सत्यजीत तांबे, आमदार
………………………………………………………….
