शिर्डी । झुंजार न्यूज
शिर्डी लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून उमेदवारी करण्यासाठी इच्छुक असलेल्या राज्य महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रुपवते यांनी बुधवारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महासचिव पदाचा व अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिल्याने काँग्रेस पक्षासाठी हा मोठा धक्का असून शिर्डी लोकसभेकरिता रुपवतेच्या रूपाने तिसरा पर्याय निश्चित उभा रहाणार असून रुपवते वंचितकडून कि अपक्ष निवडणुक लढविणार हे लवकरचं समजेल .

निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून शिर्डी लोकसभेकरिता महाविकास आघाडीकडून कोणाला उमेदवारी मिळेल अशी चर्चा होत असताना उबाठाकडून भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी जाहिर होताचं रुपवते नाराज झाल्या होत्या . महिनाभराच्या प्रतिक्षेअखेर त्यांनी कॉग्रेस पक्षाचा राजीनामा दिला .
“रूपवते यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना आपल्या राजीनामा पाठविला आहे. रुपवते- चौधरी कुटुंबातील तिसरी पिढी काँग्रेस पक्षात कार्यरत असताना निस्वार्थीपणे अहोरात्र पक्षासाठी झटणाऱ्या माझ्यासारख्या युवा कार्यकर्तीला पक्ष सोडण्याचा निर्णय का घ्यावा लागतो याबद्दल पक्ष नेतृत्वाने विचार करण्याची गरज त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात व्यक्त केली आहे. “
काँग्रेसच्या महासचिव आणि राज्य महिला आयोगाच्या सदस्य असलेल्या उत्कर्षा रुपवते या काँग्रेसने ते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या निकटवर्ती मानल्या जातात. यावेळी लोकसभा निवडणुकीसाठी त्या इच्छुक होत्या. त्या दृष्टीने त्यांचे पक्षाकडे प्रयत्न देखील सुरू होते, मात्र शिर्डीची जागा ठाकरे गटाकडे कायम राहिल्याने आणि ती जागा काँग्रेसच्या वाट्याला यावे यासाठी काँग्रेस श्रेष्ठीकडून कोणतेही प्रयत्न न झाल्यामुळे उत्कर्षा रुपवते नाराज होत्या. काँग्रेस पक्षासोबत एकनिष्ठ राहिलेल्या रुपवते कुटुंबीयांना काँग्रेसकडून वारंवार उमेदवारी नाकारली गेली आहे. २०१४ सुध्दा प्रेमानंद रुपवते यांनी निवडणुकीची तयारी केली होती तेव्हा भाऊसाहेब वाकचौरे यांना कॉग्रेस पक्षात घेवून उमेदवारी देण्यात आली होता आता सुध्दा भाऊसाहेब वाकचौरे यांना उबाठात घेवून उमेदवारी देण्यात आली . त्यामुळे निष्ठावंत डावलून बाहेरुन आलेल्यांना संधी मिळत असेल तर निष्ठावंत कुठेपर्यत रहायाचे असा प्रश्न उपस्थित होवू लागला आहे
रुपवते आता वंचित बहुजन आघाडीच्या वाटेवर असल्याची चर्चा असून त्या वंचितमध्ये प्रवेश करतात की अपक्ष उमेदवारी दाखल करतात याकडे लक्ष लागले आहे. रुपवते यांना वंचितकडून उमेदवारी मिळाल्यास या मतदारसंघात निकराची तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Post Views: 1,000
