कोल्हार । झुंजार न्यूज
अहमदनगर जिल्हा आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या राहाता तालुका अध्यक्षपदि सौ. मुक्ता तांबे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर तालुका कार्याध्यक्ष पदी सौ. सोनाली शेजुळ यांची निवड करण्यात आली.

कोल्हार येथे भगवतीमाता देवालय ट्रस्टच्या मिटींगहॉल मध्ये संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ऍड. कॉ. सुधिर टोकेकर यांच्या प्रमुख उपस्थीतीत व संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष कॉ. सुरेश पानसरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मिटींग मध्ये सदर निवडी करण्यात आल्या.

राहाता तालुका उपाध्यक्ष म्हणून ज्योती पंढुरे अश्विनी गोसावी शोभा भालेराव यांची नियुक्ती करण्यात आली तर तालुका सेक्रेटरी म्हणून संगीता शेलार यांची नियुक्ती करण्यात आली सह सेक्रेटरी म्हणून सौ. अश्विनी खाकाळे यांची नियुक्ती करण्यात आली.अनिता जाधव यांची खजीनदार म्हणून नियुक्ती करण्यात आली.

कार्यकारिणी सदस्य म्हणून मिना बनकर ज्योती थोरात शहनाज पठाण उज्वला उपाध्ये विजया गायकवाड संगीता गायकवाड सविता राजभोज यांची निवड करण्यात आली.
नवनियुक्त अध्यक्ष मुक्ता तांबे यांनी आपल्या निवडी बद्दल सर्व आशा स्वयंसेविकेचे आभार मानले आपण सर्व एक दिलाने आपल्या हक्कासाठी येथून पुढच्या काळात लढा देऊ असे त्यांनी सांगीतले तुम्ही सर्व तालुक्यातील आशा कर्मचारी मला साथ देताल अशी मि अपेक्षा करते.

या वेळेस बोलताना राज्यउपाध्यक्ष ऍड. सुधिर टोकेकर यांनी आशांना केलेली पाच हजार रुपयाची वाढ ताबडतोप द्यावी गटप्रवर्तकाना केलेली एक हजार रुपये वाढीचा जि आर मागे घेऊन त्यांना आरोग्य मंत्र्यांनी दिलेली दहा हजार रुपये वाढीचा जि आर नव्याने काढावा असे सांगीतले.

त्या साठी आचारसंहीता संपल्यानंतर लढा उभारला जाईल असे ऍड. टोकेकर यांनी सांगीतले. संघटनेच्या मावळत्या अध्यक्ष सौ. सविता धापटकर यांनी सर्व पदाधीकारी यांना शुभेच्छा दिल्या.

सदर निवडीचे भाकप चे राज्य सचिव सुभाष लांडे भगवतीमाता देवालय ट्रस्टचे अध्यक्ष सयाजी रघूनाथ खर्डे पा. आशा संघटनेचे राज्य अध्यक्ष राजु देसले यांनी नविन पदाधीकारी यांना शुभेच्छा दिल्या.

शेवटी आयटकच्या राज्य कौंसील सदस्य सौ. जयश्री गुरव यांनी आभार मानले.
