आश्वी । झुंजार न्यूज 

 

अहिंसा हमारा नारा है मानव धर्म प्यारा है चा जयघोष करत आश्वी बुद्रुक येथे जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांचा जन्म कल्याणक महोत्सव उत्साहात संपन्न.

 

 

आश्वी जैंन धर्म स्थानकात जैन साध्वी प.पुज्य.श्री सुनंदाजी महाराज, पु श्री किर्तीसुधाजी महाराज, पु श्री शुभदाजी पु श्री सुविज्ञाजी महाराज ,पु श्री भारविजी महाराज, पु श्री समृध्दीजी महाराज यांच्या उपस्थितीत जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांचा जन्म कल्याणक महोत्सव जयंती निमित्त जैन धर्म स्थानकात जैन ध्वजारोहण धनराज खुशालचंद गांधी यांच्या हस्ते झाल्यानंतर अहींसा रॅलीला सुरुवात झाली

 

हिंसा रॅली चा अग्रभागी पारंपरिक सनई चौघडा वादक,जैन ध्वज हातात घेतलेले बाल गोपा,तरुणी,लाला साड्या परिधान केलेल्या महीला अहिंसा रथ ,सफेद वस्त्र परिधान केलेले तरुण जियो ओर जिने दो,अहिंसा हमारा नारा है मानव धर्म प्यारा है,भगवान महावीर स्वामी की जय चा उदघोष करत बाजारपेठ, हनुमान रोड, बसस्थानक परीसर,वीरभद्र रोड, विठ्ठल मंदिर, बाजारतळ व नंतर जैन धर्म स्थानकात अहिंसा रॅली चा समारोप झाला . या वेळी प्रखर व्याख्याता जैन साध्वी पु श्री सुनंदाजी महाराज यांचे भगवान महावीर व त्यांचे सिध्दांत या वर प्रवचन झाले.जगात सुरुअसलेली अशांतता रशिया युक्रेन ,इस्रायल इराण युध्दा चा पार्श्वभूमीवर जगाला भगवान महावीरांचा जगा आणी जगुद्या चा सिध्दांताची गरज असल्याचे सांगितले

 

यावेळी श्रावक संघाचे अध्यक्ष सुमतीलाल गांधी,उपसरपंच अरुणाताई हिंगे, प्रवरा बॅकेचे संचालक संजय गांधी,विखे कारखान्याचे माजी संचालक विनायकराव बालोटे,केदार बिहाणी,कैलास बिहाणी,नंदकुमार लाहोटी,ब्रिजमोहन बिहाणी,अभिजीत बिहाणी,अक्षय बिहाणी, पंकज नाके, पंकज कोळपकर,योगेश लुंकड,पप्पलेश लाहोटी,राजेंद्र लुणिया ,सागर रातडीया, जयंतीलाल भंडारी,प्रशांत गांधी ,सुशील भंडारी, श्रेणीक बोरा ,मिलिंद बोरा,अभिजीत गांधी,अमरचंद गांधी ,रमेश चोपडा,अभिजीत गांधी,विनीत गांधी,अमित भंडारी,रोहित भंडारी,सुमतीलाल रातडीया ,निलेश रातडीया ,प्रितम गांधी, सतिष गांधी,दिपक बोरा,आश्वीन मुथ्था,योगेश रातडीया, विलास भंडारी , किशोर पटवा,संदीप बोरा,मनोज पटवा ,ईश्वर भंडारी सह जैन व जैनेत्र समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलोनी पटवा आभार बेबीबाई भंडारी यांनी व्यक्त केले .कार्यक्रम नंतर विठ्ठल मंदिरात धनराज खुशालचंद गांधी यांच्याकडुन गौतम प्रसादी चे आयोजन करण्यात आले होते.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed