{"remix_data":[],"source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

 

हनुमान जयंतीच्या भक्तांना दिल्या शुभेच्छा ‌!

 

 

संगमनेर । झुंजार न्यूज

 

शिर्डी लोकसभा मतदार सघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्ष रूपवते यांनी आज सकाळी येथील ऐतिहासिक हनुमान रथ मिरवणुकीत सहभागी होत रथ ओढला .

 

 

यावेळी त्यांनी उपस्थितीत असणाऱ्या सर्व हनुमान भक्तांना शुभेच्छा दिल्या. संगमनेरातील हनुमान रथ मिरवणुकीला संघर्षाचा मोठा इतिहास आहे. ब्रिटिशांच्या कालखंडात ब्रिटिशांनी हनुमान रथाची मिरवणूक रद्द करून हनुमान रथ डांबून ठेवला होता. त्यावेळी महिलांनी महिलांनी पुढाकार घेऊन मोठा संघर्ष करत या हनुमान रथाची मिरवणूक काढली होती तेव्हापासून रथ ओढण्याचा पहिला मान महिलांना दिला जातो .

 

 

गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा कायम आहे हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी संगमनेर शहरातून रथाची भव्य मिरवणूक काढण्यात येते या मिरवणुकीत महिला मोठ्या संख्येने सहभागी होतात आज सकाळी पारंपारिक उत्साहात हनुमान रथाची मिरवणूक काढण्यात आली.

 

माजी नगराध्यक्ष दुर्गाबाई तांबे शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार उत्कर्ष रुपवते यांच्यासह अनेक महिलांनी या मिरवणुकीत सहभाग घेतला. रुपवते यांनीही हनुमानाचा रथ ओढला. संगमनेरच्या हनुमान रथाची मोठी परंपरा असून राज्यासाठी ही मिरवणूक भूषणावह बाब असल्याचे सांगून रूपवते यांनी सर्व हनुमान भक्तांना शुभेच्छा दिल्या.‌

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed