संगमनेर । झुंजार न्यूज
वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांनी संगमनेर तालुक्यातील पठार भागातील वनकुटे गावातील श्री खंडोबारायाचे दर्शन घेत नागरिकांशी संवाद साधत उपस्थितीत असणाऱ्या भाविकांना श्री क्षेत्र खंडोबारायाची द्वितीय वर्धापन दिनानिमित्ताने शुभेंच्छा दिल्या .

यावेळी उत्कर्षा रूपवते म्हणाल्या की , शिर्डी लोकसभा मतदारसंघातून ही तरुणांसाठी , शेतकऱ्यांसाठी काम करण्याची मोठी संधी आहे . हा मतदार संघ नाकर्तेपणाकडे देण्यापेक्षा सुशिक्षित तरुण व महिलाकडे दिल्यास सर्वांगीण विकासाला खरोखर चालना मिळेल तर खंडोबाराया मी प्रार्थना करते की , शिर्डी लोकसभेच्या मतदारांचे कल्याणचं करेन .

रुपवते हया निवडणुकीच्या माध्यमातून सध्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात मोठ्या जोमाने फिरत आहेत उत्कर्षा रूपवते यांचा ग्रामस्थांकडून जागो जागी स्वागत व सत्कार देखील संपन्न होत असल्याने लोकांच्या चेहऱ्यावर आनंदीमय वातावरण दिसत आहे .

