संगमनेर
शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते या आज दिनांक २४ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे . या अर्ज भरण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र राज्य प्रवक्त्या दीक्षा पिंकी शेख उपस्थित राहणार आहे .यानिमित्त राहता तालुक्यातील *सिद्धी संकल्प लॉन, नगर – मनमाड हायवे येथे भव्य नामांकन रॅली काढण्यात येणार सर्व मतदार बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन वंचित आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील मतदारांच्या आग्रहामुळे बहुजन वंचित आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांनी उत्कर्ष रूपवते यांच्यावर विश्वास ठेवून वंचित बहुजन आघाडीची अधिकृत उमेदवारी त्यांना जाहीर केली होती. रुपवते यांच्या उमेदवारीचे संपूर्ण मतदारसंघातून उस्फूर्त स्वागत करण्यात येत आहे. उत्कर्षा रूपवते यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मतदार संघातील सर्व तालुक्यांना भेटी दिल्या आहेत. रुपवते यांना मतदारांनी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी उत्कर्षा रुपवते २४ एप्रिल बुधवार रोजी नामांकन अर्ज भरणार आहे. यानिमित्त राहाता येथे आयोजित नामांकन रॅली मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे, आवाहन उमेदवार उत्कर्षा रूपवते यांनी केले आहे.
