आश्वी । झुंजार न्यूज

 

राज्यातील मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळवून देण्यासाठी ऐतिहासिक लढा उभारणारे संघर्षयोद्धे मनोज जरांगे-पाटील हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे संभाजीनगर येथे खाजगी रुग्णालयात दाखल झालेले असल्याने त्यांच्या प्रकृतीची विचारपुस करण्यासाठी शिर्डी लोकसभेतील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांनी

 भेट घेतली .   
मनोज जरांगे यांची उत्कर्षा रुपवते यांनी तब्येतीची विचारपूस करत आशिर्वाद घेतले. यावेळी जरांगे यांना साईबाबांची मूर्ती भेट दिली आणि लवकर बरे व्हा दादा तुमची या समाजवर्गाला गरज असल्याची सदिच्छा व्यक्त केली .

यावेळी रुपवते म्हणाल्या की , मराठा आरक्षणाला पाठींबा देण्यासाठी मी संपूर्ण शिर्डी लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यातील आंदोलनकर्ते तरुणांना भेटले होते. त्यावेळी युवावर्गात आणि एकूणच समाजामध्ये जरांगे पाटील दादांबद्दल असलेल्या अफाट श्रद्धेची भावना मी जवळून अनुभवली आहे. तेव्हा दादा लवकर बरे व्हा, तुमच्या मार्गदर्शनाची आम्हांला गरज असल्याचे रुपवते म्हणाल्या .

चौकट
शिर्डी लोकसभेत निवडणुकीच्या माध्यमातून फिरताना गावो – गावी , वाडया – वस्त्या मध्ये युवक , वयोवृध्द व महिलांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed