मराठा, आदीवाशी , मुस्लिमांचा रुपवतेंना पाठिंबा
शिर्डी । झुंजार न्यूज
शिर्डी लोकसभा निवडणुकीचा राजकीय पारा दिवसेंदिवस अधिकच तापू लागला आहे. ही निवडणूक आता अधिकच रंगतदार होणार आहे. दोन आजी-माजी प्रतिस्पर्धी खासदारांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीकडून बहुजन चळवळीतील तरुण तडफदार अभ्यासू नेत्या उत्कर्षा रुपवते यांनी उमेदवारी दाखल केल्यामुळे आजी-माजी खासदारांनाही घाम फुटला आहे. अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला सर्वप्रथम पाठिंबा दिलेला असल्यामुळे मराठा समाजाची मते वंचित बहुजन आघाडीकडे वळली जाणार असल्याची शक्यता तर विविध गावांमधून विविध समाज्यातील तरुणांचा मिळणारा पाठिंबा त्यामुळे सेनेच्या दोन प्रतिस्पर्धी आजी-माजी खासदारांना ही निवडणूक आता मोठी चिंतेत व घाम फोडणारी ठरत आहे . शिर्डीत सेनेच्या दोन आजी माजी खासदारांच्या विरोधात उत्कर्षा रुपवते यांची प्रचार यंत्रणा सक्रिय झाल्यामुळे त्यांच्या या उमेदवारीला सर्वच समाजातून मोठी पसंती आहे.

धनगर , माळी , आदीवाशी , मराठा समाजही रुपवतेंच्या उमेदवारीचे स्वागत करुन अर्थिक मदतही करत असल्यामुळे निवडणूक मोठी चुरशीची होणार आहे. मुस्लिम, दलित आणि ख्रिश्चन समाज रुपवते यांच्या उमेदवारीचे स्वागत करत असल्यामुळे रुपवतेंची गाडी शिर्डीच्या मैदानात सुसाट सुटणार असल्याचे चित्र दिसत आहे.

शिर्डीत दिग्गज नेत्यांच्या भूमिका गुलदस्त्यातच !
लोकसभेनंतर विधानसभा निवडणूक होणार असल्यामुळे शिर्डीच्या राजकीय मैदानात लोकप्रतिनिधी केवळ जनतेचा कौल जाणून घेत असल्यामुळे दिग्गज नेत्यांच्या राजकीय भूमिकाही अद्यापपर्यंत गुलदस्त्यात असल्यामुळे शिर्डीच्या रणांगणात ‘थांबा आणि पहा’च्या भूमिकेत लोकप्रतिनिधी दिसत असल्यामुळे खुले वातावरण सर्वत्रच दिसून येत असल्याचे राजकीय आखाड्यात बोलले जात आहे
