शिबलापूर । झुंजार न्यूज

आपला संगमनेर तालुका हा पुरोग्रामी विचाराचा असून आपण त्या विचाराचे पाईक आहोत आदरणीय बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली या तालुक्याची विकासात्मक जडण – घडण झाली आहे तर सहकार , आर्थिक , व्यवसायिक , शैक्षणिक क्षेत्रात क्रांतीकारक बदल होवून सर्व सामान्यासह शेतकरी , दुग्ध व्यवसायिक आपले जीवन सुखाने जगत असून भविष्यात पारदर्शक , स्वच्छ व विकासात्मक सरकार येण्याकरिता महाविकास आघाडीच्या उमेदवारांचं मतदान करा असे आवाहन कॅन्सर तज्ञ डॉ जयश्रीताई थोरात यांनी केले .
संगमनेर तालुक्यातील पुर्व भागाकडील असणाऱ्या  शेडगाव येथील लक्ष्मीआई यात्रोत्सवा निमित्ताने कॅन्सर तज्ञ डॉ जयश्री थोरात यांनी भेट देवून भाविकांना शुभेंच्छा  दिल्या तसेच शिबलापूर येथील संरपच प्रमोद बोंद्रे यांच्या निवासस्थानी झालेल्या महिलांची बैठक त्या बोलत होत्या .
जयश्रीताई थोरात पुढे म्हणाल्या की , संध्याचे राजकिय वातावरण अस्थ व्यस्थ झाले असून दिशाहिन राजकारणाला तरुण व महिलांचं सुधारू शकेल 2024 च्या लोकसभेच्या निवडणुका होत असून शिर्डी लोकसभा मतदार संघात महा विकास आघाडीकडून उबाठाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे असून त्यांची निशाणी मशाल आहे त्यांना आपल्याला निवडून दयाचे आहे ही जबाबदारी आपल्यावरचं असून आदरणीय बाळासाहेब थोरात यांच्यावर राज्याची जबाबदारी असल्याने कार्यकर्त्यांनी आपण उमेदवार समजावून कामाला लागावे असे आवाहन केले ‘
 यावेळी संगमनेर दूध संघाचे व्हाचेअरमन राजेंद्र चकोर , राजहंस दूध संघाचे संचालक तथा पानोडीचे  उपसरपंच विक्रम थोरात, शिबलापुर ग्रा प  सदस्या सौ यमुनाताई नागरे, सुभाष भागवत मुन्तोडे, माजी संरपच दिलावर शेख, वसंत भाऊ मुन्ताडे, बानिडेन नागरे, भानुदास नागरे, बबन नागरे, संजय म्हस्के, रमेश रघुनाथ मुन्तोंडे , बन्सी मुन्तोंडे , महेंद्र जाधव, मधुकर मुन्तोंडे , शिवाजी बोद्रे , राजेंद्र नागरे , राजेंद्र बोद्रे ,  विक्रम नागरे, विशाल मुन्तोंडे ,  शिवाजी आव्हाड  , सौ आशा वालझाडे, नेहा बोंद्रे, अलका शिंदे, कौशल्या नागरे , हसीना शेख , रसुल शेख, सलीम शेख, फॉन्सीस मुन्तोंडे , स्नेहल आव्हाड, वत्सलाबाई मांढरे , केशरबाई बोंद्रे , शितल उगलमुगले, रंजना मुन्तोंडे , कल्पना शेजवळ , सिंधूबाई मृन्तोडे, मिना मुन्तोडे , बबिता बोंद्रे आदीसह मोठया संख्येने महिला पुरुष उपस्थित होते .
यावेळी संरपच प्रमोंद बोंद्रे यांनी प्रास्ताविक केले . तर जयश्रीताई थोरात यांचे औक्षण नेहा बोंद्रे यांनी केले .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *