राहता । झुंजार न्यूज
शिर्डी लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या तरुण तडफदार महिला उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्या होणाऱ्या प्रचार दौराला कडाक्याच्या ऊन्हातून सुध्दा गती दिसून येत आहे राहता तालुक्यातील दोन दिवसीय दौरया दरम्यान अक्षरशा अनेक गट व गण गावांना त्यांनी भेटी दिल्या . यावेळी गावो – गावी उशिरापर्यंत सामान्य माणुस थांबून राहिल्याचे दिसलेचं मात्र महिलांनी मोठ्या उत्साहात त्यांचे औक्षण करून स्वागत केले.

, सावळी विहीर, साकुरी,रूई,पिंपळस, रांजणगाव, बाभेळश्वर,काकडी,वाकळी केलवड, दहेगाव,अस्तगाव, निर्मळ पिंपरी ,राजुरी,खळी,लोहगाव आदी गावामध्ये त्यांनी उपस्थित नागरिकांच्या सोबत संवाद व कॉर्नर सभांच्या मा़ध्यामातून संवाद साधला, येथील प्रश्न आणि समस्या समजून घेतल्या. विकासाबात त्यांनी आपले व्हिजन लोकांसमोर मांडले.राहता तालुक्यातील लोकप्रतिनिधीची तिरकस नजर लोकसेवकांचा अल्पवेळ यामुळे येथील गावात विकास हा फक्त नावालाच दिसतो. या गावांतील पाणी प्रश्नावर त्यांनी नागरिकांशी सखोल चर्चा केली सत्तेत आल्यानंतर राहता तालुक्यातील पाण्याचा महत्वाचा प्रश्न जिकरीने सोडवुन सर्वच गावं पाणीदार बनवु आणि शोषित वंचित दुर्लक्षितासह सर्वाना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहु तसेच स्थानिक रोजगार प्रश्न व येथील शिक्षण आदी अनेक प्रश्न सोडवु असे आश्वासन यावेळी रुपवते यांनी दिले.

प्रसंगी तरुण आणि महिला वर्गाची गर्दी लक्षणीय होती राहता तालुक्यातील त्यांना भरघोस प्रतिसाद मिळाल्याचे चित्र निर्माण झाले असून गावो गावी आता आपल्याला पर्याय मिळाला व खऱ्या खासदार आपल्याला मिळणार अशी चर्चा लोकांमधून होताना दिसत .
