शिर्डी । झुंजार न्यूज

लोकसभा निवडणुकीत शिर्डी मतदारसंघातून हातकणंगले मतदारसंघातून राष्ट्रीय पक्षांचे उमेदवार वगळता बहुतांशी उमेदवार स्थानिक पक्षांचे किंवा अपक्ष आहेत. कोणी सायकलवर फिरून, कोणी दुचाकीला फलक लावून, तर काही उमेदवारांनी रिक्षा, टेम्पोला फलक लावून प्रचार सुरू केला आहे. भ्रष्टाचार, रोजगार, महागाई, संविधान रक्षण, पाणी, आरोग्य असे मुद्दे घेऊन हे उमेदवार आपली भूमिका मतदारांना पटवून देत मतदानाचे आवाहन करत आहेत. त्यातील प्रशांत निकम यांच्याशी साधलेला हा संवाद…

“आताचे राजकीय पक्षावाले उमेदवार त्यांच्याकडे भांडवल असल्याने प्रचारासाठी गावोगावी फिरतील पैसा- दारू देतीलच तसेच खोटे आश्वासने देखील देतील परत निवडून आल्यानंतर फिरकणार सुद्धा नाही. पण माझे उलटे असेल… मी आता प्रचारसाठी आपल्या प्रत्येक वाडी वस्तीवर गावागावात पोहचणे शक्य होते की नाही सांगता येत नाही.. मला आपल मत देऊन सेवा करण्याची संधी दिली तर मी प्रत्येक गावात खेड्यापाड्यात तळ्यात मळ्यात वाडी वस्तीवर विकास कामाचा आढावा घेण्यासाठी फिरकल्या शिवाय राहणार नाही.. कारण हा प्रामाणिक सर्वसामान्य कष्टकरी माणसाची जाण असलेल्या अपक्ष उमेदवाराचा आवाज आहे”..

2024 लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु असून शिर्डी लोकसभेतून दोन शिवसेना , वंचित यांच्यासह विविध पक्ष , संघटना व अपक्षांनी आपले नशिब अजमावण्याकरिता निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून या निवडणुकीच्या माध्यमातून सदाशिव लोखंडे ( शिदे गट ) , भाऊसाहेब वाकचौरे ( ठाकरे गट ) व वंचितकडून उत्कर्षा रुपवते यांच्या रुपाने खऱ्या अर्थाने तिरंगी लढत दिसत आहे मात्र संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील एक होतकरु तरुणांने आपला उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणुकीचे वातावरण निर्माण केले आहे .

गेल्या अनेक वर्षापासून लोकसभा , विधानसभा निवडणुकीमधून तेचं ते चेहरे दिसत असल्याने या निवडणुका त्यांच्या भोवती फिरताना दिसत आहे या निवडणुकी सर्व सामान्यांना संधी कधी मिळणार हे पडलेला प्रश्न आहे . ७० ते ८० वर्षाच्या राजकिय प्रवासात प्रास्तापित , श्रीमंत यांच़्या भोवतीचं राजकिय वारे फिरताना दिसले मग सर्व सामान्यांना संधी केव्हा आता वेळ आली आहे परिवर्तनाची अभी नही तो , कभी नही . .
