अकोले । झुंजार न्यूज
2024 शिर्डी लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार शिंगेला पोहचला असून वंचित उमेदवार उत्कर्षा रुपवते ह्या प्रत्येक तालुक्यातील गावो गावी , वाड्या – वस्त्यावर जावून हर घरमें है प्रेशर कुकर , तो हर लोगोंके मनमें है । उत्कर्षा रूपवते या म्हणीप्रमाणे लहानग्या पासून मोठ्यापर्यंत आता परिवर्तनाची लाट सुरु झाल्याने जन सामान्यातील प्रत्येकांच्या तोंडी उत्कर्षाचे नाव निघत असल्याने मग चार वर्षाची मुलगी का मागे रहाणार राजूर येथील सुबोधी संतोष पवार हिने चक्क आपल्याला खाऊकरिता मिळालेल्या पैसेचं उत्कर्षाताई रुपवतेच्या स्वाधीन करत तुम्ही आता आमचे खासदार व्हा अशा शुभेंच्छा दिल्या .

शिर्डी लोकसभा मतदारसंघातून दोन सेनेच्या एक उबाठा तर दुसरे शिंदे गटाच्या उमेदवारांविरोधात तिसरा पर्याय म्हणून वंचितकडून उत्कर्षा रुपवते उभ्या राहिल्या उत्कर्षा ह्या तरुण तडफदार महिला असल्याने त्या गावो गावात वाड्या वस्त्यात फिरून प्रचार करत आहे . त्यांना मोठा उंदड प्रतिसाद मिळत असून आर्थिक मदत सुध्दा मिळत आहे . जेवढी आर्थिक मदत मिळत जाईल तेवढी मते मिळतील .
