कोपरगाव । झुंजार न्यूज 

शिर्डी लोकसभेचा वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार उत्कर्षा रूपवते यांच्या प्रचारार्थ गुरुवार दि .9 मे 2024 रोजी कोपरगाव शहरात सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत विजय संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली .

 

वंचित बहुजन आघाडीने शिर्डी लोकसभेत एन्ट्री केल्यामुळे शिर्डी लोकसभेची तिरंगी लढत रंगतदार होताना दिसत आहे.आजी-माजी खासदारांच्या पेक्षा प्रचारात उत्कर्षा रूपवते कधीचं पुढे निघून गेल्या हे आजी माजी खासदारांना समजलचं नाही . 

 

 

श्रीरामपुरात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची प्रचंड मोठी सभा झाली या सभेनंतर संगमनेरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अहमदनगर शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुद्धा सभा झाली उद्धव ठाकरे श्रीरामपूरात भाऊसाहेब वाकचौरेसाठी सभा घेणार आहेत तर पुन्हा आता वंचित बहुजन आघाडीकडून कोपरगाव शहरांमध्ये विजय संकल्प सभेचे उत्कर्षा रूपवते त्यांच्या प्रचारार्थ सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली आहे.

 

 

ही सभा कोपरगाव शहरातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदानावर गुरुवार दिनांक 9 मे रोजी संध्याकाळी 06:00 वाजता संपन्न होणार या सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहा असे आवाहन वंचित बहुजन आघाडी उत्तर नगर जिल्ह्याकडून सांगण्यात आले आहे”

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *