आश्वी । झुंजार न्यूज

आश्वी येथील व्यापारी नवलमल रामचंद्र भंडारी यांची नात व सुशील भंडारी व  वैशाली भंडारी यांची कन्या मुमुक्षु कु प्रतिक्षा भंडारी हिने चतुर्विध संघा चा उपस्थित जैन भगवती दीक्षा ग्रहण केली. दीक्षा नंतर तिचे जैन साध्वी मोक्षदाजी असे नामकरण करण्यात आले.
आश्वीच्या इतिहासात प्रथमच दीक्षा महोत्सवाचे आयोजन समितीने केले होते. एकच गुरु आनंद गुरु चा जयघोष,  करतय प्रतिक्षा हिस अरीहंत फर्टिलायझर पासून शोभायात्रा काढून दीक्षास्थळी आणले. उपाध्याय प्रवीण ऋषीजी यांच्या सानिध्यात प्रतिक्षा ने जैन भागवती दीक्षा ग्रहण केली. दीक्षा महोत्सवासाठी उपाध्याय प्रवर प्रवीण ॠषीजी महाराज ,मधुर कंठी तीर्थेशॠषीजी महाराज, प्रखर व्याख्याता  लोकेश ॠषीजी महाराज ,कैवल्यधाम प्रेरक कैवल्यरत्नाश्रीजी महाराज उपप्रवरतिनी.  चन्दन बालाजी महाराज, बुलंदवानी पदमावतीजी महाराज उपप्रवरतिनी  साध्वी सन्मतीजी महाराज , जिनशासन गौरव सुनंदाजी महाराज , सेवाभावी किर्तीसुधाजी महाराज, मधुर व्याख्याता विश्वदरशनाजी महाराज,राजस्थान विरांगना जयश्रीजी महाराज,  आदींसह ४० साध्वी उपस्थित होत्या. प्रतिक्षा ही साध्वींचा वेश परिधान करून मंचावर येताच उपस्थितांनी जयजयकार केला.
दीक्षापुर्वी प्रतिक्षा भंडारी मनोगत व्यक्त करतांना म्हणाली की, राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज, तसेच अनेक साधु-साध्वींच्या आशिर्वाद मला लाभले. गुरूवर्या सुनंदाजी महाराज यांनी धर्म संस्कार घडविले. माता पिता भंडारी परिवार यांनी मला संयमीव्रत धारण करण्यासाठी अनुमोदना दिली. आज परिवार व आश्वी सोडून मी गुरूनीजींच्या सानिध्यात संयमी व्रत धारण करीत आहे. सकल जैनवासियांनी परिवाराची कन्या समजून थाटामाटात हा दीक्षा महोत्सव करीत मला संयमी व्रतासाठी प्रेरणा दिली. परिवारामध्ये संत होणे यास पूर्व पुण्याई लागते. ही पुण्याई भंडारी परिवारात व आश्वीवासीयांत असल्यामुळेच दीक्षा महोत्सव उत्साहात धार्मिक वातावरणात पार पडला.  
माजी खासदार डाॅ सुजय विखे ,डाॅ संजय मालपाणी, डाॅ सुधीर तांबे यांनी मनोगत व्यक्त करीत प्रतिक्षा हिच्या संयमीव्रतास शुभेच्छा दिल्या.
दीक्षा महोत्सवासाठी माजी खासदार डॉ सुजय विखे ,मा आमदार डाॅ सुधीर तांबे,माजी जिल्हापरिषद अध्यक्ष शालिनीताई विखे जैन कॉन्फरन्सचे अध्यक्ष रमणलाल लुक्कड, बाबुशेठ बोरा, संजयजी मालपाणी, राजेंद्र पिपाडा,नंदुशेठ भटेवरा,  ह भ प जलाल महाराज सय्यद, विखे कारखान्याचे अध्यक्ष कैलास तांबे,अॅड शाळीग्राम होडगर, भगवानराव इलग, यांच्यासह. अहमदनगर  जिल्ह्यासह महाराष्ट्रातून हजारो भाविक उपस्थित होते.
दीक्षा महोत्सवासाठी भामाशाहा रमणलाल लुक्कड, औंध पुणे यांनी सभा मंडपासाठी तर  प्रकाशलाल धारीवाल,  यांनी सहकार्य केले. दीक्षा महोत्सवासाठी योगदान देणार्‍या लाभार्थींचा सत्कार दीक्षा समितीने केला. दीक्षा महोत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी स्थानकवासी जैन समाज, माहेश्वरी समाज, ब्राम्हण समाज, कासार समाज, आश्वी ,अकोला, संगमनेर, सोनगाव ,लोणी ,प्रवरानगर ,कोल्हारसह रुपा गोडगे, सुमतीलाल गांधी,विनीत गांधी,अभिजीत गांधी,किशोर पटवा, प्रवरा बॅकेचे संचालक संजय गांधी,योगेश  रातडीया ,राजेंद्र  लुणीया,सागर रातडीया,योगेश लुंकड,जयंतीलाल भंडारी,अनिल  पितळे,स्वप्नील लुंकड, पप्पलेश लाहोटी,अभिजीत बिहाणी, केतन बिहणी,विजय बिहाणी,नंदुशेठ लाहोटी,अश्विन मुथ्था,ईश्वर भंडारी,प्रितम गांधी,किरण गांधी,दिपक बोरा,मंगेश रासने,रोहित भंडारी,अमित भंडारी ,यश बोरा,नितीन गांधी,निलेश चोपडा,पंकज नाके,पंकज कोळपकर, समीर गांधी,भगवान बोरा,श्रेणीक बोरा, प्रशांत गांधी,गौतम गांधी, गौतम रातडीया , निलेश रातडीया,रमेश धर्माधिकारी सह जैन श्रावक संघाचे सदस्य, नवकार ग्रुप सदस्य,यांनी दीक्षा समारंभ यशस्वीतेसाठी परीश्रम घेतले.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *