संगमनेर । झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्यातील तळेगाव भागात सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या देवराम नारायण गोडगे सामाजिक प्रतिष्ठानतर्फे संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील शिक्षणमहर्षी गुलाबराव गोविंदराव जोंधळे माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य हरिभाऊ रामनाथ दिघे यांना शैक्षणिक क्षेत्रात कार्य उल्लेखनीय केल्याबद्दल पदाधिकारी मान्यवरांच्या हस्ते समाजभूषण पुरस्कार पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
तळेगाव दिघे येथील संस्कृती मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात देवराम नारायण गोडगे सामाजिक प्रतिष्ठानतर्फे शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार प्रदान सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.
प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सुनील उकिर्डे यांच्या हस्ते तसेच शिवव्याख्याते अनिल येवले व अभिजीत आहेर, यांच्या प्रमुख उपस्थितीत शाल, स्मृतिचिन्ह, रविवार दि. ०२/०६/२०२४ रोजी सकाळी ९ ते १० वाजता सन्मानपत्र देवून प्राचार्य हरिभाऊ दिघे यांचा समाजभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला. प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब दिघे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार गोडगे, प्रभारी सरपंच मयूर दिघे, कौठेकमळेश्वरचे उपसरपंच नवनाथ जोंधळे, रमेश दिघे, महेंद्र सोनवणे, शरद भागवत, शिवाजी गोडगे, अमोल पाडेकर, जय लहारे, अॅड. अविनाश गोडगे, संजय दिघे, गणेश दिघे सहित पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. 
प्राचार्य हरिभाऊ दिघे यांच्या प्रयत्नातून ग्रामीण भागात असलेल्या तळेगाव दिघे येथील शिक्षणमहर्षी गुलाबराव जोंधळे विद्यालयाचा प्रतिकूल परिस्थितीत कायापालट करण्यात आला आणि गुणवत्तेला उंचीवर नेण्यात आले. त्यांच्या सदर कार्याची दखल घेत समाजभूषण पुरस्कार देवून त्यांना गौरविण्यात आले. समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल प्राचार्य दिघे यांचे पदाधिकारी व मान्यवरांनी कौतुक व अभिनंदन केले.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *