संगमनेर । झुंजार न्यूज
शुक्रवार, दिनांक १२ जुलै २०२४ रोजी इनव्हेसटीचर समारंभ आयोजित केला होता. त्यावेळी अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेचे शैक्षणिक संचालक डॉक्टर जे.बी. गुरव, शाळा संचालिका सौ.अंजली कन्नावर, मुख्य सल्लागार कु. स्नेहल शेखदार यांच्या उपस्थितीत इन्व्हेसटीचर(शपथविधी) समारंभ साजरा झाला.

त्यावेळी पालक, शिक्षक व विद्यार्थीही उपस्थित होते. निडो स्कूल नेहमीच गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी कार्यरत आहे.

स्कूल अंतर्गत नवनिर्वाचित परिषद सदस्यांचे कु. ब्रह्मा ओहोळ (हेडबॉय), कु. रीया पाटणी (हेड गर्ल ),कु. तन्मय सोनवणे( क्रीडा कर्णधार), कु. अन्वित लिंबेकर (एक्सक्वीझिट एम्राल्ड हाऊस कॅप्टन ), कु. विराजस वामन ( रेडियंट रुबी हाऊस कॅप्टन ), कु. आर्यन भांगरे ( स्पार्कलिंग सफायर हाऊस कॅप्टन ), कु.गौरी सांगळे( ग्लिटरिंग टोपाझ हाऊस कॅप्टन ), कु. स्वस्तिका केदार ( रेडियंट रुबी व्हाईस हाऊस कॅप्टन ), कु. वेदांत कडलक ( एक्सक्वीझिट एम्राल्ड व्हाईस हाऊस कॅप्टन ), कु. पृथ्वीराज नेहे (ग्लिटरिंग टोपाझ व्हाईस हाऊस कॅप्टन )आणि कुमार आर्यन शेरमाळे (स्पार्कलिंग सफायर व्हाईस हाऊस कॅप्टन ) या विद्यार्थ्यांना स्कूलच्या संचालिका सौ. अंजली कन्नावर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी शपथ घेऊन त्यावेळी त्यांना त्यांचे बॅज अभिमानाने मिळाले. ते नेतृत्वगुणांची जबाबदारी स्वीकारण्याच्या त्यांच्या तयारीचे प्रतीक आहे.

डॉ. जे.बी गुरव आणि शाळा संचालिका सौ. अंजली कन्नावर यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी भाषणे देऊन सचोटी, धैर्य आणि चिकाटीच्या महत्त्वांवर भर दिला. या समारंभाने नेतृत्वाच्या नवीन वर्षाची सुरुवात केली आणि शाळेच्या उत्कृष्टतेसाठी सामूहिक वचनबद्धतेची पुष्टी केली. संस्थेच्या विश्वस्त शरईताई देशमुख यांनी निवडून आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
